Close

रामोजी ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष आणि सिनेनिर्माते रामोजी राव यांचे निधन ( Film Producer And Chairman Of Ramoji Rao Filmcity Ramoji Rao Passes Away)

रामोजी ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष रामोजी राव यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. आज सकाळी हैदराबादच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते बरेच दिवस आजारी होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रामोजी राव हे माध्यम विश्वातील एक मोठे व्यक्तिमत्व मानले जायचे. ते रामोजी फिल्म सिटी आणि ईटीव्ही नेटवर्कचे मालक होते. 2016 मध्ये त्यांना पद्मविभूषणनेही सन्मानित करण्यात आले होते.


मिळालेल्या माहितीनुसार, उच्च रक्तदाब आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रामोजी राव यांना ५ जून रोजी हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पीएम मोदींनीही रामोजी राव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

पीएम मोदींनी इंस्टाग्रामवर लिहिले की, रामोजी राव गरू देशाच्या विकासासाठी खूप उत्कट होते. त्यांच्याशी संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या बुद्धीचा लाभ घेण्याच्या अनेक संधी मिळाल्या हे माझे भाग्य आहे. या कठीण काळात त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि असंख्य चाहत्यांसाठी माझ्या संवेदना. ओम शांती.


रामोजी राव हे भारतीय चित्रपट निर्माते आणि उषाकिरण मूव्हीज या निर्मिती कंपनीचे प्रमुख होते. त्यांना चेरुकुरी रामोजी राव या नावानेही ओळखले जात असे. ते रामोजी फिल्म सिटीचे मालक होते, जगातील सर्वात मोठी चित्रपट निर्मिती सुविधा म्हणून ती ओळखली जाते. सिनेविश्वातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले.

Share this article