Close

परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात, मेहंदीचे फोटो आले समोर (FIRST Pictures Of Parineeti Chopra And Raghav Chadha’s Mehendi Ritual)

अभिनेत्री परिणीती चोप्रा 24 सप्टेंबर 2023 रोजी राघव चढ्ढासोबत स्वप्नवत लग्न करणार आहे. मीडियाकडून मिळालेल्या ताज्या बातम्यांनुसार, परिणीती आणि राघवच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. अरदास आणि मेहंदी समारंभ पार पडला आहे. या जोडप्याच्या मेहंदी सोहळ्याचे पहिले फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेहंदी सोहळ्याच्या पहिल्या फोटोमध्ये परिणिती आणि राघव कुटुंबातील इतर सदस्यांसह जमिनीवर बसून अर्दास करत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये परिणीती आणि राघव पाहुण्यांसोबत एकमेकांचा हात धरून पोज देत आहेत.

मेहंदी सोहळ्यादरम्यान, गुलाबी रंगाचा शरारा आणि कुर्ता असलेला नेट दुपट्टा परिधान करून परिणिती खूपच गोंडस दिसत आहे. तर राघव चड्ढा कुर्ता-पायजमा आणि परिणीतीच्या आउटफिटशी जुळणारे जॅकेट घालून सुंदर दिसत आहे.

परिणीती आणि राघव यांचे लग्न राजस्थान, उदयपूर येथील लीला पॅलेस आणि उदयविलास ओबेरॉय येथे पारंपारिक रितीरिवाजानुसार पंजाबी रितीरिवाजानुसार होणार आहे.

मेहंदी, हळदी आणि संगीत हे सर्व विधी पार पाडले जातील. कडेकोट सुरक्षा आणि उत्कृष्ट व्यवस्था असलेल्या या लग्नाला अनेक राजकीय नेते, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि हाय प्रोफाईल पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

Share this article