Close

पती-पत्नीने एकमेकांसाठी वेळ दिलाच पाहिजे! (For A Happy Married Life, Couple Must Spare Merry Time For Each Other)

हल्लीच्या स्पर्धात्मक युगामध्ये टिकून राहण्यासाठी पुष्कळ वेळा नवरा-बायको आपआपल्या ऑफिसच्या कामामध्ये व्यस्त असतात. दोघेही सुशिक्षित असल्याने करिअरचे ध्येय ठरवायला पाहिजे. किती कालावधीमध्ये ऑफिसमध्ये कुठल्या पदापर्यंत पोहचायचे याची पण जाण पाहिजे. या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात बहुतेक जोडप्यांना आपल्या जोडीदारासाठी वेळ देणं हल्लीच्या ‘बिर्झीें शेड्युुलमध्ये शक्य होत नाही. एकमेकांच्या आवडी-निवडी माहीत असूनही वेळेच्या अभावी जोपासणे बहुतेकांना शक्य होत नाही!
रात्री झोपण्याच्या वेळी ते एकमेकांना भेटतात. पण गेल्या काही वषार्ंंमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून जो तो मोबाईलमध्ये गर्क झालेला आढळतो.  त्यामुळे एकमेकांशी, कुटुंबातील सदस्यांबरोबर बोलणे सुध्दा नीट होत नाही. हल्लीच्या जमान्यात बहुतेक 97 टक्के कुटुंबात नवरा-बायको दोघेही नोकरी करीत असतात. शहरातील बदलत्या आणि धकाधकीच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये आयटी, खासगी बँका, सरकारी बँका, को. ऑप. बँका, सरकारी-निमसरकारी कार्यालये, कंपन्या येथे काम करणार्‍या नवरा-बायकोला त्यांच्या करिअरमध्ये स्पर्धा, कामाचे दडपण, जबाबदार्‍या आणि दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या महागाईमुळे आर्थिक गणित कसे बसवायचे यामधून एकमेकांसाठी वेळ मिळणे कठीण होते ही सत्य परिस्थिती आहे.
नात्यामध्ये संवाद हवा
निकृष्ट, निःसत्त्व आहार, वाढते प्रदूषण तसेच ऑफिस प्रवासाच्या दगदगीने नवरा-बायको इतके थकलेले, दमलेले  असतात की, त्यांना जवळीक साधण्यात अपयश येत आहे. बिछान्यावर अंग टेकण्यासाठी, झोपण्यासाठी समोरासमोर येतात पण त्यावेळी सुध्दा कधी कधी ते मोबाईलवर व्हॅाट्स अप चॅटिंग, सिनेमा, ऑनलाइन गेम यामध्ये गर्क असल्यामुळे सेक्ससाठी सुध्दा वेळ मिळत नाही! याचा परिणाम शारीरिक नात्यांवर होतो. मनामध्ये दुरावा निर्माण होण्याची स्थिती सुध्दा नाकारता येत नाही. रात्री जेवण-काम आटोपल्यानंतर ते जरी सेक्ससाठी जवळ आले नाहीत तरी मिळालेला काही वेळ आभासी जगामध्ये होणार्‍या संवादापेक्षा एकमेकांबरोबर होणारा संवाद - गप्पा मारण्यासाठी हसत खेळत घालविणे गरजेचे आहे. कारण कितीही मोठी समस्या असली तरी ती दूर होऊ शकते. नात्यामध्ये संवाद फार महत्त्वाचा असून नवरा-बायकोमध्ये संवाद नसेल तर त्यांचे नाते टिकण्याची शक्यता कमी असते.  त्यासाठी झोपायला जाण्यापूर्वी नवरा-बायकोने झोपण्यापूर्वी मोबाईल इंटरनेट बंद करून ई-मेल तपासूच नये व त्यांचे मोबाईल शक्यतो बाजूला सायलन्सेवर ठेवायला पाहिजे. कारण झोप, डोळे, मेंदू यांना विश्रांती आवश्यक असल्यामुळे मोबाईलपासून दूर राहणे वैद्यकीय, शास्त्रीयदृष्ट्या आवश्यक आहे.

एकमेकांचा आदर करा
स्त्री पुरुषाच्या जीवनामध्ये लग्न हा एक संस्कार असून नवरा बायकोचे मैत्रीपूर्ण सहजीवन आवश्यक असते. नवरा-बायको म्हणजे एका रथाची दोन चाकं. जितकी चाकं मजबूत तितकाच रथ सुरक्षित असतो.  जेवताना, नाष्टा करताना किंवा चहा कॉफी पिताना जोडीदाराबरोबर  संभाषणाच्या   निमित्ताने  एक  प्रकारची  जवळीक  निर्माण  करा.
मानसिकदृष्ट्या  ते  एकमेकांजवळ  आल्यामुळे  स्वभावाची  ओळख  होते. एकमेकांच्या कामाचे कौतुक होते. गप्पा होत असल्यामुळे छोटे छोटे क्षण अनुभवता येतात. पुढील आयुष्याची वाटचाल ठरविण्यास मदत होते. उच्च शिक्षण, पैसे कमविण्यासाठी नोकरी यातला आनंद शोधता येतो. कारण धावपळीने व यांत्रिक जीवनाने नात्यांमधील ऊब हिरावली जातेय.  लग्नानंतर दोघांच्या नात्यातील मैत्री कमी होऊ देऊ नका.  पती-पत्नीचा संवाद कधीही संपता कामा नये. लग्नानंतर एकमेकांचा आदर करणे गरजेचे असते.  सेक्स करण्यानेच नवरा-बायकोचे नाते घट्ट होते असे नाही तर एकमेकांना वेळ देणं, एकमेकांसाठी वेळ काढणे, एकमेकांच्या भावना व इच्छा जितक्या समजून घ्याल तितकाच संसार सुरळीत होईल. सहवास मिळण्यासाठी स्वतःच्या आवडीसाठी दोघांनी वेळ काढणे हे महत्त्वाचे असते. आपआपसातील दोघांच्या संभाषणामुळे पे्रमभावना वाढीस लागते. ताणतणाव कमी होतो.  एकमेकांच्या अडचणींचा सामना करायला मदत होेते. मित्र मैत्रिणींच्या कानावर आलेल्या काही गोष्टींमुळे शिकायला मिळते.

शब्दांपेक्षा स्पर्श जास्त बोलतो
कधीकधी शरीरसंबंधाची- सेक्सची गरज असतेच असे नाही. तर प्रेमाचा एक स्पर्श, एखादे रोमँटिक चुंबन किंवा एकमेकांच्या कुशीत पडून राहण्यानेही खूप फरक पडतो. मानसिक आणि शारीरिक स्थिती व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि पती-पत्नी मधील नातं जास्त दृढ करण्यासाठी चुंबन हे महत्वाची भूमिका बजावते असे वैज्ञानिकदृष्टया देखील स्पष्ट झालेलं आहे. शब्दांपेक्षा स्पर्श जास्त बोलतो. एवढंच नव्हे तर एकमेकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते.
यामुळे नवरा-बायकोमध्ये प्रेमाला नवी उभारी मिळून प्रेम वाढीस लागतेच पण नाते सुद्धा घट्ट होण्यास मदत होते. आयुष्यभर टिकण्यास याची फार जरुरी आहे. नात्यामधील प्रेम टिकवून ठेवण्यासाठी कधी कधी स्तुती किंवा प्रेमळ खोटं बोलावं लागलं तरी त्यात गैर काहीच नाही. (यामधून आपला हेतू साध्य होतो.) एकमेकांच्या सुखासाठी झटणे, निःस्वार्थी त्याग करणे ही वृत्ती येते.

पती-पत्नीमध्ये रुसवे फुगवे, भांडणे होतात. ही अगदी साधी गोष्ट आहे पण त्यालाही काही मर्यादा आहेत. हे ध्यानात घ्यायला हवे. यावेळी मुख्यत्वे आपला अहंकार बाजूला ठेवायला हवा. विश्‍वासार्हता हे नवरा-बायकोच्या जीवनाचे मूळ सूत्र आहे. विश्‍वासामुळे नात्यात गोडवा येतो. तसेच नात्यामध्ये एकमेकांची साथ असणे आणि परस्परांमधील सामंजस्य हे पती-पत्नीचे आधारस्तंभ आहेत. नवरा बायकोने स्वतःसाठी वेळ काढायला हवा. अधूनमधून कामातून सुट्टी घेऊन आपल्या आवडीच्या गोष्टी करायला हव्यात. दररोज शक्य नसेल तरी आठवड्यातून एकदा दोघांनी फिरायला गेलेच पाहिजे. रोजची जबाबदारीची कामे ही करायला हवीत. आर्थिक बाबतीत दोघांचे एकमत झाल्यावर जीवनातील चढउतारांना सामोरे जाणे शक्य होते.  परस्परांविषयी नकारात्मक विचारांना स्थान नको.

यामुळे ऊर्जा कमी होते. नेहमी सकारात्मक विचार केले पाहिजेत. आपल्या पत्नीच्या मनामध्ये विश्‍वासार्हता, प्रेम निर्माण करा की, काही झालं तरी तुम्ही तिच्यासोबत आहात यामुळे संसाराचे नाते निभावता येऊन सहजीवनामध्ये जिवंतपणा येईल!

Share this article