बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक सेलिब्रिटींनी आपल्या दमदार अभिनय कौशल्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, अनेक सेलिब्रिटींची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर होतात. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री या सौंदर्याची खाण आहेत असेच म्हणावे लागेल. यातील अनेक अभिनेत्री बहुगुणसंपन्न आहेत, ज्या अभिनयाव्यतिरिक्त अनेक विविध गोष्टींमध्ये पारंगत आहेत. आज आम्ही तुम्हाला अभिनयासोबतच फॅशन डिझायनिंगमध्येही पारंगत असलेल्या अभिनेत्रींची माहिती देणार आहोत.
सोनम कपूर
बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक सोनम कपूर तिच्या फॅशन सेन्ससाठी चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे, म्हणूनच तिला फॅशन दिवा देखील म्हटले जाते. सोनम एक अभिनेत्री असण्यासोबतच फॅशन डिझायनर असून तिचा ‘रेसन’ नावाचा स्वतःचा फॅशन ब्रँड आहे.
दीपिका पादुकोण
दीपिका पादुकोण सुंदर असण्यासोबतच एक अप्रतिम अभिनेत्री आहे, म्हणूनच तिच्या प्रत्येक अभिनयासाठी चाहते जीव ओवाळून टाकतात. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच दीपिकाने फॅशन डिझायनिंगमध्येही हात आजमावला आहे. तिचा ‘ऑल अबाऊट यू’ नावाचा स्वतःचा ब्रँड आहे.
आलिया भट्ट
एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेली आलिया भट्ट इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्री असण्यासोबतच आलिया एक उत्तम फॅशन डिझायनर देखील आहे. आलियाने आपण डिझाइन केलेल्या ड्रेसच्या फॅशन शोमध्ये पहिला रॅम्प वॉक केला होता.
सोनाक्षी सिन्हा
या यादीत बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाच्या नावाचाही समावेश आहे. सोनाक्षीने अभिनयाच्या जगात पाऊल ठेवण्यापूर्वी फॅशन डिझायनिंगचा कोर्स केला होता आणि ती एक चांगली फॅशन डिझायनर देखील आहे.
मलायका अरोरा
मलायका अरोरा ही बॉलिवूडमधील फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. ती तिच्या फिटनेस आणि फॅशन सेन्ससाठी अनेकदा चर्चेत असते, प अभिनेत्रीचा ‘द क्लोसेट लेबल’ नावाचा फॅशन ब्रँड देखील आहे.
लारा दत्ता
बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये दिसलेली अभिनेत्री लारा दत्ता अभिनेत्रीसोबतच फॅशन डिझायनरही आहे. अभिनेत्रीने स्वतः अनेक कपडे डिझाइन केले आहेत.
शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टी ही इंडस्ट्रीतील एक बहुगुणसंपन्न अभिनेत्री आहे. ती एक उत्तम डान्सर, कुक आणि अप्रतिम फॅशन डिझायनर देखील आहे. याच कारणामुळे ती अनेकदा तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्समुळेही चर्चेत असते.