एआयच्या (AI) कमालीने अवघ्या इंटरनेट विश्वाला भुरळ घातली आहे. Lensa’s AI मुळे या गोष्टींना सुरुवात झाली. एआयच्या सहाय्याने नेटिझन्सनी स्वतःचे फोटो अनेक पौराणिक अवतारांमध्ये बदलले. आता बॉलिवूड कलाकार या प्रवाहात सामील झाले आहेत. त्यांनी स्वतःला हॉलिवूड पात्रांचे रूप दिले आहे.
रणवीर सिंह, अजय देवगण, अनिल कपूर ते रजनीकांत, प्रभास, ज्युनिअर एनटीआर व महेश बाबू या दाक्षिणात्य सुपरस्टार्सनी हॉलिवूडच्या इंडियाना जोन्समधील इंडी या पात्रात रुपांतरित केले आहे. या इंग्रजी चित्रपटाच्या मालिकेतील हॅरिसन फोर्ड यांचा वेष व त्यांच्या आयकॉनिक हॅटमध्ये ही मंडळी दिसत आहेत.
या दिंडीमध्ये विराट कोहली, एम.एस.धोनी आणि सचिन तेंडुलकर या क्रिकेटवीरांचे लूक व्हायरल होत आहेत. हॅरिसन फोर्डची प्रमुख भूमिका असलेला ‘इंडियाना जोन्स ॲन्ड द डायल ऑफ डेस्टिनी’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. त्या निमित्ताने हे लूक व्हायरल झाले आहेत. सदर चित्रपट इंग्रजी-हिंदीसह तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होत आहे.