महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेने एक धक्कादायक पोस्ट शेअर केल्याने चाहते दुखी झाले आहेत. अभिनेत्याने हा लोकप्रिय शो सोडल्याची घोषणा केली आहे.
हॅलो एव्हरीवन मी गौरव मोरे पवई फिल्टरपाडा टना ना ट ना ना.....आरा बाप मारतो का काय मी….ये बच्ची……☺️
रसिक प्रेक्षक आपण हया साध्या मुलाला खूप प्रेम दिलं. नाव दिलं, सन्मान दिलात त्याबद्दल मी आणि माझा परिवार आपले कायम ऋणी आहोत..
मला सांगताना खूप वाईट वाटतयं की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच “महाराष्ट्राची हास्य जत्रा” मधून आपला निरोप घेत आहे.
माझ्या कामातून कोणच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासुन माफी मागतो.
महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडून अगदीच काही दिवस झाले आणि नवा शो घेऊन तुमच्या भेटीला आलो, माध्यम सारखं राहिलं आणि तुमचं प्रेम देखील ! असं म्हणतात ना नव्या प्रवासाची गोष्ट और असते आणि म्हणूनच नव्या प्रवासात नव्या शोसाठी तुमचा खंबीर पाठिंबा कायम असावा. नवा प्रवास सुरू झाला आणि यातून देखील तुमच्या सारख्या रसिक प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणार आहे म्हणून तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा प्रेम असच राहू दे...