टीव्ही जगतातील सर्वात लोकप्रिय जोडपे पंखुरी अवस्थी आणि गौतम रोडे यांनी एप्रिल 2023 मध्ये गर्भधारणेची घोषणा केली होती. आणि अखेर या दाम्पत्याच्या घरात दुहेरी आनंद आला आहे. गौतम रोडे आणि पंखुरी अवस्थी हे नुकतेच जुळ्या मुलांचे पालक झाले आहेत, त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली आहे.
प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडपे पंखुरी अवस्थी आणि गौतम रोडे यांनी नुकतेच जुळ्या मुली आणि मुलाचे स्वागत केले आहे. या जोडप्याने सोशल मीडियावर अॅनिमेटेड व्हिडिओ शेअर करून त्यांच्या चाहत्यांना आणि प्रियजनांना गरोदरपणाची आनंदाची बातमी दिली. हा व्हिडिओ 3 टप्प्यांमध्ये विभागलेला आहे- पहिली भेट, दुसरी लग्न आणि तिसरी बाळाच्या आगमनाची गोड बातमी.
आणि अखेर या जोडप्याने जुळ्या मुलांचे स्वागत केले आहे. आपल्या जुळ्या मुलांवर प्रेमाचा वर्षाव करताना या जोडप्याने आपण दोन लाडक्या मुलांचे पालक झाल्याचा खुलासा केला आहे. या जोडप्याचे चाहते खूप दिवसांपासून या गुड न्यूजची वाट पाहत होते आणि अखेर तो दिवस आला आहे.
सेलिब्रिटी जोडप्याने काही वेळापूर्वी सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी जाहीर केली आहे की ते जुळ्या मुलगा आणि मुलीचे पालक झाले आहेत. ही आनंदाची बातमी शेअर करताना, जोडप्याने नमूद केले आहे की मुलांचा जन्म 25 जुलै रोजी झाला आणि ते आता ही गोड बातमी त्यांच्या फॅन्स आणि फॉलोअर्ससोबत शेअर करत आहेत.
नोटमध्ये, जोडप्याने लिहिले - आम्हाला हे कळवताना खूप आनंद होत आहे की आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी जुळी मुले झाली आहेत. 25 जुलै 2023 रोजी जुळ्या मुलांचा जन्म झाला. आम्ही दोनाचे चार झालो आहोत. आमच्या कुटुंबाचा प्रवास सुरू करत आहोत आणि त्याचीच ही घोषणा करत आहोत. मन आनंदाने आणि कृतज्ञतेने भरले आहे.तुमच्या सर्व प्रेम आणि आशीर्वादांसाठी खूप खूप धन्यवाद - गौतम आणि पंखुरी. गुलाबी आणि निळ्या रंगाच्या पोस्टरवर कपलने ही नोट लिहिली आहे.
दिव्यांका त्रिपाठी, देवोलिना भट्टाचार्य, भारती सिंग, मोहसीन खान, आमिर अली, अमित टंडन, विवेक दहिया आणि रोहन शाह यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर गौतम आणि पंखुरीला जुळे झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.