छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आपला ठसा उमटवणारे प्रसिद्ध अभिनेते राम कपूर यांची पत्नी गौतमी कपूर हीसुद्धा एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. दोघांच्या लग्नाला जवळपास २० वर्षे झाली आहेत. अनेक वर्षांपासून ते एकमेकांसोबत आनंदी जीवन जगत आहेत. गौतमी आणि राम कपूर यांच्या लव्हस्टोरीबद्दल बोलायचे झाले तर ती फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. असे म्हटले जाते की गौतमी कपूरने तिच्या ऑनस्क्रीन दिरावर भाळली होती, त्यानंतर त्याच्याशी लग्न करण्यासाठी तिने कुटुंबाविरूद्ध जाण्यास मागे पुढे पाहिले नाही.
असे म्हटले जाते की, जेव्हा गौतमी कपूर आणि राम कपूर टीव्ही सीरियल 'घर एक मंदिर'मध्ये एकत्र काम करत होते, तेव्हापासून त्यांच्यातील जवळीक वाढू लागली आणि दोघेही खऱ्या आयुष्यात एकमेकांच्या प्रेमात पडले. या शोमध्ये रामने गौतमीच्या दिराची भूमिका साकारली होती. याच सेटवर दोघांमध्ये मैत्री झाली आणि या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले.
गौतमी आणि राम कपूर, एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले, मग त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. दोघांच्या घरच्यांना जेव्हा हे कळाले तेव्हा ते याच्या विरोधात उभे राहिले, पण या जोडप्याने त्यांच्या मनाप्रमाणे केले. गौतमीने तिच्या घरच्यांविरुद्ध बंड केले. घरच्यांनी नकार दिल्यानंतर दोघांनीही मंदिरात जाऊन 2003 साली लग्न केले.
गौतमीचे राम कपूरसोबतचे हे दुसरे लग्न आहे, तर राम कपूरचे हे पहिले लग्न आहे. गौतमीने रामची पत्नी होण्यापूर्वी व्यावसायिक छायाचित्रकार मधुर श्रॉफसोबत लग्न केले होते. लग्नापूर्वी गौतमीचे नाव गौतमी गाडगीळ होते. मधुर श्रॉफशी लग्न झाल्यानंतर गौतमीला तिच्या निर्णयाचा पश्चाताप होऊ लागला आणि त्यांच्या नात्यात इतक्या वेगाने तडा गेला की दोघांचा घटस्फोट झाला.
गौतमी कपूरने तिच्या अभिनय कारकिर्दीत अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ती 'क्योंकी सास भी कभी बहू थी', 'खेलती है जिंदगी आँख मिचोली', 'कहता है दिल', 'परवरिश सीझन 2' सारख्या मालिकांमध्ये दिसली आहे. याशिवाय गौतमीने अनेक मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
विशेष म्हणजे अभिनयाच्या जगात येण्यापूर्वी गौतमीने मॉडेलिंगच्या जगातही नशीब आजमावले आहे. मॉडेलिंगमधून अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवणारी गौतमी कपूर खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आणि बोल्ड आहे. गौतमी आणि राम कपूर हे दोन मुलांचे पालक आहेत, त्यांच्या मुलाचे नाव अक्स आणि मुलीचे नाव सिया कपूर आहे. ती अनेकदा पती आणि मुलांसोबत हॅप्पी फॅमिलीचे फोटो शेअर करत असते.