'गंदी बात' फेम अभिनेत्री गेहना वशिष्ठ पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्या फोटोत तिच्यासोबत अभिनेता सोशल मीडिया इन्फलूएन्सर फैजान अन्सारी नवरदेवाच्या वेशात दिसत होता. त्या फोटोंमुळे सोशल मीडियावर गोंधळ निर्माण झाला होता. पण आता गेहनाने एक वेगळा खुलासा केला आहे. तिने आपले लग्न झाले नसल्याचे स्पष्ट आहे.
याबाबत तिने एक पत्रक जारी केले आहे. त्यात तिने लिहिले की,
नमस्कार मंडळी, मी घेहना वसिष्ठ. मला हे स्पष्ट करायचे आहे की , मी कधीही कोणाशीही लग्न केले नव्हते आणि ते फक्त वेबसीरिज शूट होते. बाकी काही नाही. आणि मी फैजानलाही फारसे ओळखत नाही, माझ्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या वेळी मी त्याला भेटले आणि नंतर शूटसाठी माझी ती दुसरी भेट होती…
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला त्याचे पूर्ण नाव देखील माहित नाही, तो कोठूनचा आहे किंवा तो काय करतो याबाबत मला काहीच माहिती नाही.
मला खूप वर्षांपासून प्रियकर आहे आणि त्याचे नाव राम आहे … त्यामुळे इतर कोणाशीही आणि विशेषत: ज्यांना मी ओळखतही नाही अशा कोणाशीही लग्न करण्यात काही अर्थ नाही..