रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांना बॉलिवूडचे पॉवर कपल म्हटले जाते. दोघांमध्ये केवळ ऑनस्क्रीनच नाही तर ऑफस्क्रीन देखील रोमँटिक बॉन्ड आहे. सोशल मीडियावरही दोघांचे फॅन फॉलोअर्स खूप आहेत. दोघेही अनेकदा सोशल मीडियावर फनी व्हिडिओ शेअर करत असतात, जे लोकांना खूप आवडतात. या जोडप्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अपडेट्स जाणून घेण्यासाठी चाहतेही नेहमीच उत्सुक असतात.
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत ताजी बातमी अशी आहे की लवकरच त्यांच्या घरी एक गोड बातमी येण्याची शक्यता आहे. हे जोडपे तिसऱ्यांदा पालक बनणार असल्याचा अंदाज जेनेलियाच्या लेटेस्ट फोटो वरुन वर्तवला जात आहे. वयाच्या ३६ व्या वर्षी ती तिसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
जेनेलिया नुकतीच पती रितेशसोबत एका कार्यक्रमात दिसली. जेनेलियाने जांभळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला होता, ज्यामध्ये तिचा बेबी बंप चाहत्यांना स्पष्ट दिसत होता आणि चाहते तिला तिच्या प्रेग्नेंसीबद्दल प्रश्नही विचारत होते.
इव्हेंटमध्ये जेनेलिया वारंवार पोटावर हात ठेवताना दिसली आणि तिचा बेबी बंपही दिसत होता. कमेंट सेक्शनमध्ये चाहते जेनेलियाला विचारत आहेत की ती प्रेग्नंट आहे का? ती तिसऱ्यांदा आई होणार आहे का? मात्र आत्तापर्यंत जेनेलिया आणि रितेशकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. या वृत्ताला दोघांनीही दुजोरा दिलेला नाही आणि नाकारलाही नाही.
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा यांनी २०१३ मध्ये प्रेमविवाह केला होता. दोघांच्या वयात ९ वर्षांचा फरक आहे. जेनेलिया रितेशपेक्षा 9 वर्षांनी लहान आहे. दोघांना दोन मुलगे आहेत.