Close

नवर्‍याच्या उधळ्या स्वभावाला कसे आवरू? (How To Change The Mindset Of A Shopping And Party Crazy Husband?)

आमच्या लग्नाला 7 वर्षे झाली आहेत. नवर्‍याला चांगल्या पगाराची नोकरी आहे. मी घरातच वावरणारी असल्याने ते मला घरखर्च चालविण्यासाठी वेळोवेळी पैसे देतात. पण मी ते पैसे सांभाळून खर्च करते. किराणा माल, भाजीपाला, दूध वगैरे वस्तू आवश्यक तेवढ्याच खरेदी करते. अन् हाती आलेल्या पैशातून काही पैशांची बचत करते. उरलेले पैसे राखून ठेवते. अशी बर्‍याच पैशांची बचत मी केलेली आहे. पण माझ्या नवर्‍याचा स्वभाव अगदी माझ्या विरुद्ध आहे. त्यांचा स्वभाव उधळ्या आहे. एक तारखेला पगार झाला की, त्यांचा हात सैल सुटतो. स्वतःसाठी, माझ्यासाठी आणि आमच्या एकुलत्या एक मुलासाठी ते काही ना काही शॉपिंग करतातच. दर महिन्याला शॉपिंग करण्याच्या त्यांच्या या सवयीने पैशांची उधळपट्टी होते. अन् माझ्या जिवाला घोर लागतो. वीकएन्डला मित्रांसोबत किंवा घरच्या लोकांना घेऊन हॉटेलात पार्टी करतातच. आम्हालाही त्यांचे मित्र, घरची माणसे हॉटेलात बोलावतात, तो भाग वेगळा. पण अशा पार्ट्यांमधून फार पैसे माझे मिस्टर उधळतात, ते मला आवडत नाही. तुम्ही अशी गेट-टू-गेदर घरीच साजरे करा. मी त्यासाठी स्वयंपाकघरात खपायला तयार आहे, असं त्यांना मी अनेक वेळा सांगून झालं आहे. पण ते ऐकतच नाहीत. शिवाय अधूनमधून घरी हॉटेलातून खाद्यपदार्थांचे पार्सल ते मागवतात. त्यांच्या या उधळ्या स्वभावाला कसा आवर घालू, तेच कळत नाही.

  • प्रतिभा, सोलापूर
    नवरा आणि बायको यांचे स्वभाव भिन्न असणे, हे आपले विधिलिखित आहे. जगभरात स्वभावाची ही विसंगती आढळून येते. यामुळे काही संसार सुरळीत चालतात, तर काही बिघडतात. तशी वेळ आपल्यावर येऊ नये, म्हणून जास्त करून स्त्रियांनाच तडजोड करावी लागते, हेही तितकंच खरं आहे. परंतु याची फारशी चिंता करण्याचं कारण नाही. समस्या आहे, तिथे तोडगा आहेच! तेव्हा तुमच्या नवर्‍याच्या उधळ्या स्वभावाला औषध नाही, असे समजून निराश होऊ नका. नवर्‍याची उधळपट्टी तुम्ही गांभीर्याने घेत आहात. त्याच गांभीर्याने त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला. त्रागा न करता, चिडून न जाता बोला. दर महिन्याला शॉपिंग करण्याची गरज नाही. त्याने घरात पसारा वाढतो. हॉटेलातून पार्सल मागवून खाण्यापिण्याचे पदार्थ मागविण्याची गरज नाही. त्याच्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, हे त्यांना पटवून द्या. हॉटेलात दर वीकएन्डला पार्टी करण्यापेक्षा घरी करा, हेही त्यांच्या गळी उतरवा. हा सर्व खर्च अनावश्यक, अनाठायी आहे. आपल्याला मुलगा आहे. त्याचे शिक्षण, संगोपनासाठी भविष्यात पैशांची तरतूद करणे गरजेचे आहे. आजकाल शिक्षण किती महाग झाले आहे. पुढेही ते होणारच आहे. शिवाय अचानक उद्भवणारे आपले आजार, घरातील वृद्ध माणसांच्या आजारपणासाठी लागणारे महागडे उपचार, यासाठी भरपूर पैसे लागतील. भविष्यातील या मोठ्या खर्चांसाठी आत्तापासून तयारी करून ठेवली पाहिजे, या सर्व गोष्टी तुमच्या नवर्‍याला शांतपणे समजावून सांगा. उपयोग होईल.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/