प्रतिष्ठित ७७ वा ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ सुरू झाला आहे. ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये दरवर्षी आपल्या ग्लॅमरस लूकने चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या ऐश्वर्याने यंदाही रेड कार्पेट गाजवलं. ‘कान’च्या रेड कार्पेटवर ऐश्वर्याचं हे २२ वं वर्ष होतं. तिचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. खरं तर ऐश्वर्या व ‘कान फिल्म फेस्टिव्हल’चं नातं खूप जुनं आहे. २००२ मध्ये तिने ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत ऐश्वर्याचे अनेक लूक चाहत्यांना पाहायला मिळाले आहेत. ‘कान’च्या थिमप्रमाणे तिचे लूक असतात.
‘कान फिल्म फेस्टिव्हल’ सुरू होऊन एका आठवड्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. खासकरून भारतातील चाहते आणि फॅशन प्रेमी ‘कान’च्या कार्पेटवर ऐश्वर्या राय बच्चनला पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ऐश्वर्याचा ‘कान’ मधील यंदाचा ग्लॅमरस लूक चाहत्यांना पाहायला मिळाला आहे. नेहमीप्रमाणेच यंदाही माजी मिस वर्ल्ड आणि लॉरिअल पॅरिसची ब्रँड ॲम्बेसेडर ऐश्वर्याने आपल्या जादुई लूकने चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे.
५० वर्षीय ऐश्वर्याने फ्रान्सिस फोर्ड कोपोलाच्या ‘मेगालोपोलिस’ चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी रेड कार्पेटवर वॉक केला. गोल्डन टच असलेला तिचा ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस खूपच सुंदर दिसत होता. ऐश्वर्याच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे तिच्या उजव्या हातावर प्लास्टर दिसून आलं. चेहऱ्यावर एक सुंदर हास्य ठेवत ऐश्वर्याने रेड कार्पेटवर वॉक केला आणि पोज दिल्या. ऐश्वर्याचे या सोहळ्यातील फोटो व व्हिडीओ खूपच चर्चेत आहेत.