आज २१ जून ! म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिन!
जगभरात साजरा होत असलेल्या या योगशास्त्राचा सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी आपल्या भारतात झाला आहे. योग ही जीवनशैली असून ती स्वीकारल्यास व्यक्ती आपल्या जीवनात शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक स्तरावर यशस्वी होऊन आनंदमय जीवन व्यतीत करू शकते.
२०१४ साली भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी हा दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव अमेरिकेत, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडला होता. या प्रस्तावात योगासनांचे लाभ आणि त्याचे आरोग्यावर होणारे चांगले परिणाम याचे विवेचन करण्यात आले होते. या प्रस्तावाला ३ महिन्यांनंतर पाठिंबा दिला आणि हा आंतरराष्ट्रीय योग दिन गेली ८ वर्षे जगभरात साजरा केला जात आहे.
यंदाच्या योग दिनाचे वैशिष्ट्य असे की, पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांचा अमेरिका दौरा आजपासून सुरू होत आहे. न्यूयॉर्क येथे मोठ्या प्रमाणात योग प्रात्यक्षिके सादर केली जाणार असून, या सोहळ्यास मोदीजी जातीने हजर राहणार आहेत.