उदयपूर, राजस्थान येथे लग्नाचे सर्व विधी पार पाडल्यानंतर आणि मुंबईत भव्य रिसेप्शनचे आयोजन केल्यानंतर, आमिर खानची मुलगी इरा खान पती नुपूर शिखरेसोबत तिचा हनीमून साजरा करण्यासाठी बाली येथे रवाना झाली आहे. इरा खानने पतीसोबतचे क्यूट फोटो शेअर केले आहेत.
अखेर इरा खान आणि नुपूर शिखरे विवाहबंधनात अडकले आहेत. लग्नाचे सर्व सोहळे आटोपल्यानंतर इरा खान आणि नुपूर शिखरे त्यांच्या हनीमूनला रवाना झाले आहेत.
नवविवाहित जोडप्याने त्यांच्या हनिमूनसाठी बाली हे ठिकाण निवडले. इरा खानने तिच्या सोशल मीडिया हँडलवर हनीमूनला जाताना तिचा आणि नुपूरचा फोटो शेअर केला आहे. हे फोटो शेअर करताना इराने लिहिले - इमिग्रेशन लाईनवर एकत्र आलो.
इराने स्वतःचे आणि नुपूरचे जे फोटो शेअर केले आहेत ते विमानतळावरील आहेत. एका फोटोत दोघेही एअरपोर्ट लाउंजमध्ये पोज देत सेल्फी घेत आहेत.
दुसर्या फोटोत, दोघे त्यांच्या हनिमूनसाठी बालीला उड्डाण करत असताना फ्लाइटमध्ये पेयांचा आनंद घेताना दिसत आहेत. इराने ग्रे टॉप आणि ग्रे जॅकेट घातले आहे आणि नुपूर निळ्या सॅंडो काळ्या रंगाचे जॅकेट घातलेली दिसत आहे.
आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी इरा खानने 10 जानेवारीला बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधली.
३ जानेवारीला इरा खान आणि नुपूर शिखरे यांनी मुंबईत लग्नाची नोंदणी केली होती. नवविवाहित जोडप्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.