बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) आणि जावेद अख्तर यांच्यामधील वाद हा सर्वांनाच माहिती आहे. कंगना राणावत हिने जावेद अख्तर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले. इतकेच नाही तर यांचे प्रकरण हे थेट कोर्टात गेले. आता जावेद अख्तर यांच्यासोबतच्या कायदेशीर लढाईत कंगना राणौतला कोर्टानं मोठा दणका दिला आहे. मुंबईच्या दंडाधिकारी न्यायालयाने जावेद अख्तर यांच्यावर लावण्यात आलेले चार आरोप फेटाळले तर दोन आरोपांबाबत समन्स पाठवले आहे.
कंगनाने जावेद अख्तर यांच्यावर अनेक आरोप केले होते. ज्यावेळी कंगना आणि हृतिक रोशन यांच्यात वाद झाला होता त्यावेळी त्यांनी कंगनाला आणि तिची बहीण रंगोली चंदेलला जावेद यांनी आपल्या घरी बोलावून हृतिक रोशनची माफी मागायला सांगितली होती.
न्यायालयाने म्हटले की, गीतकार जावेद अख्तर यांच्यावर खंडणीचा कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मुंबई मॅजिस्ट्रेट कोर्टाने असेही म्हटले आहे की एखाद्या व्यक्तीला लेखी माफी मागायला सांगणं हे कायद्या अंतर्गत येत नाही कारण कायदेशीर हक्क तयार, विस्तार किंवा सोयीच्या मार्गाने हस्तांतरित केला जाऊ शकत नाही.
कंगनाने आरोप केला होता की जावेद अख्तर यांनी तिला धमकावले आणि बळजबरीने हृतिक रोशनची माफी मागण्यास सांगितले. त्याचबरोबर तिने जावेद यांच्यावर खोटे आणि निराधार वक्तव्य करून तिची प्रतिमा खराब केल्याचा आरोप केला.
तिच्या नैतिक चारित्र्यावर घाला घालणे, तिची प्रतिष्ठा आणि पावित्र्य दुखावल्याचा आरोप केला आहे. इतकच नाही तर त्यांनी जाणूनबुजून तिच्या नम्रतेचा अपमान आणि वैयक्तिक संबंधांवर टिप्पणी केली आहे. तर जावेद अख्तर यांनी कंगना राणावत विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती.
मंगळवारी दंडाधिकारी आरएम शेख यांनी सर्व युक्तिवाद आणि सबमिशन विचारात घेतल्यानंतर निर्णय दिला. कंगना राणौतने केलेल्या सहा आरोपांपैकी फक्त दोन आरोपांवरच ते कारवाई करणार असल्याचं सांगितलं. या दोन आरोपात जावेद अख्तर यांना धमकावणे आणि महिलेच्या विनयशीलतेचा अपमान केल्याच्या आरोपाखाली समन्स जारी केले. आता जावेद अख्तर यांना ५ ऑगस्ट रोजी अंधेरी न्यायालयात हजर रहावे लागणार आहे.