अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांनी 'बंटी और बबली', 'कभी अलविदा ना कहना' आणि युवा यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. 'बंटी और बबली' चित्रपटातील त्यांची जोडी लोकांना खूप आवडली. अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांची करिश्मा कपूरसोबतची एंगेजमेंट तुटल्यानंतर जवळीक वाढू लागली.
राणी मुखर्जीने अमिताभ बच्चन यांच्यासोबतही अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते ज्यात कभी खुशी कभी गम, ब्लॅक, बंटी और बबली, कभी अलविदा ना कहना, बाबुल का नाम यांचा समावेश होता. त्यावेळी राणी मुखर्जी तिच्या करिअरच्या शिखरावर होती. पण यानंतर असे काही घडले की राणी आणि अभिषेकचे नाते अर्धवटच राहिले.
राणी मुखर्जी अचानक बच्चन कुटुंबापासून दूर गेली. यामागे 'ब्लॅक' चित्रपटातील राणी मुखर्जीचा किसिंग सीन कारण असल्याचे म्हटले जाते. हा किसिंग सीन राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चनचे वडील अमिताभ बच्चन यांच्यामध्ये चित्रित करण्यात आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जया बच्चन यांना राणी मुखर्जीने 'ब्लॅक' चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत किसिंग सीन करु नये असे वाटत होते. पण राणी मुखर्जीने अमिताभ बच्चनसोबत हा किसिंग सीन करण्यास होकार दिला होता. त्यामुळे जया बच्चन अभिनेत्रीवर संतापल्या.
'ब्लॅक' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर राणी मुखर्जीचे आई-वडील आपल्या मुलीसाठी अभिषेकचा हात मागायला बच्चन कुटुंबाला भेटायला गेले होते पण त्यावेळी जया बच्चन यांनी या नात्याला स्पष्ट नकार दिला.
या घटनेनंतर राणी मुखर्जीने अभिषेक बच्चनशी बोलणे बंद केले होते. यानंतर, 2007 मध्ये अभिषेक बच्चनने माजी मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत लग्न केले. तर राणी मुखर्जीने बॉलिवूड चित्रपट निर्माता आदित्य चोप्रासोबत लग्नगाठ बांधली होती.