टेलिव्हिजनवरील रिअॅलिटी शोज्ने पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. सलमान खानच्या बिग बॉस व्यतिरिक्त, असाच एक शो आहे जो डोळ्यांचे पारणे फेडतो तो म्हणजे सेलेब डान्स-रिअॅलिटी शो ‘झलक दिख ला जा’. या शो मध्ये न्यायाधीश म्हणून बी-टाऊनचे करण जोहर, माधुरी दीक्षित ते रेमो डिसूझा पर्यंत प्रमुख सेलिब्रिटी आणि स्पर्धक म्हणून टीव्ही स्टार दिसले आहेत. आता झलक दिखला जा लवकरच त्याच्या अकराव्या पर्वासह परत येणार आहे शिवाय या शोमध्ये सहभागी होणाऱ्या ११ सेलिब्रिटींची यादीही जाहिर आली आहे.
#BiggBoss_Tak हँडलने झलक दिखला जा ११ ची पुष्टी केलेली यादी जाहीर केली आहे. ‘बिग बॉस’ मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे ‘झलक दिखला जा’च्या ११ व्या पर्वात सहभागी होणार आहे. ‘रोडीज’च्या १४ व्या पर्वापासून तो घराघरांत लोकप्रिय झाला. ‘बिग बॉस मराठी’ मुळे रातोरात त्याचं नशीब उजळलं. त्यानंतर हिंदी ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’ या कार्यक्रमांमधून त्याने स्वत:चा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला. ‘बिग बॉस’मुळे शिवला सर्वत्र ‘आपला माणूस’ ही नवी ओळख मिळाली. प्रेक्षकांचा लाडका ‘आपला माणूस’ आता ‘झलक दिखला जा’च्या नव्या शोमध्ये एन्ट्री घेण्यास सज्ज झाला आहे. शिवसह या शोमध्ये कोण-कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार? जाणून घेऊया…
‘झलक दिखला जा’च्या ११ व्या पर्वातील निश्चित १० स्पर्धकांची नाव नुकतीच समोर आली आहेत. ‘ससुराल सिमर का’ फेम शोएब इब्राहिम, ‘बिग बॉस मराठी २’चा विजेता शिव ठाकरे, उर्वशी ढोलकिया, आमिर अली, तनीषा मुखर्जी, संगीता फोगाट, अंजली आनंद, राघव ठाकूर, करूणा पांडे, अदरीजा सिन्हा हे सेलिब्रिटी यंदाच्या पर्वात झळकणार आहेत. तर फराह खानने ती यावर्षी तीन न्यायाधीशांपैकी एक असणार असल्याची पुष्टी केली आहे.
‘झलक दिखला जा’मध्ये शिवचा कोरिओग्राफर रोमेश सिंह असणार आहे. शिवने त्याच्या करिअरची सुरूवात डान्सपासून केली होती. स्वत:चे डान्स क्लास असल्यामुळे त्याला याबाबत प्रचंड माहिती आहे. त्यामुळे अर्थातच शिव ठाकरेने हे ‘झलक दिखला जा’चं हे पर्व जिंकावं अशी त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. दरम्यान, हा शो ११ नोव्हेंबरपासून सोनी टीव्हीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
गेल्या वर्षी, गुंजन सिन्हा झलक दिखला जा १० ची विजेती होती तर रुबिना दिलैक ही उपविजेती ठरली होती.