साहित्य : ६ कोळंबी, १ चमचा मद्रासी कांदा चिरलेला, १/४ टीस्पून तूप, १ टीस्पून टोमॅटो प्युरी, अर्धा कप नारळाचे दूध, २ टीस्पून कांद्याची पेस्ट, १/४ टीस्पून हिरवी मिरची चिरलेली, १ टीस्पून आले-लसूण पेस्ट, चिमूटभर हळद, १/४ टीस्पून गरम मसाला, १ तमालपत्र, काही कढीपत्ता, १ टीस्पून एका जातीची बडीशेप, तेल आणि आवश्यकतेनुसार मीठ.
कृती : कोळंबी मीठ आणि हळद घालून १५ मिनिटे मॅरीनेट करून गरम तेलात तळून घ्या. नंतर कढईत तेल गरम करून त्यात कांदा, आले-लसूण पेस्ट, गरम मसाला, हिरवी मिरची, तमालपत्र आणि टोमॅटो प्युरी घालून मंद आचेवर परतून घ्या. आता कोळंबी, नारळाचे दूध आणि अर्धा कप पाणी घालून उकळी येईपर्यंत शिजवा. दुसऱ्या कढईत तूप गरम करून मद्रासी कांदा, बडीशेप आणि कढीपत्ता याची फोडणी करा आणि ग्रेव्हीमध्ये घाला. गरमागरम रोटी किंवा भातासोबत सर्व्ह करा.