Close

लहानग्यासोबत वेळ घालवत पुन्हा बालपण जगला जितेंद्र जोशी, शेअर केली खास पोस्ट ( Jitendra Joshi Share Indian Army Officer little Baby Post)

अभिनेता जितेंद्र जोशी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. अनेकदा तो त्याच्यासोबत घडलेल्या गोष्टी किंवा किस्से तिथे शेअर करतो. अशाच एका रिसॉर्टमध्ये भेटलेल्या चिमुकल्याबद्दल रोहितने लिहिले आहे.

पोस्टमध्ये लिहिले आहे कीस आपल्या भारतीय सैन्यातील जवान विक्रम कुंभार यांचा 10 महिन्यांचा मुलगा विराज . 2 दिवसांपूर्वी मला प्रकृती रिसॉर्ट ला दिसला . बघताक्षणी हसला आणि लगेचच जवळ आला आणि 2 दिवस सतत येऊन खेळत होता. त्याची आई म्हणाली आजपर्यंत कुणाही जवळ गेला नाही कुणास ठावूक तुमच्याकडे कसा आला? उत्तर मलाही अर्थातच माहीत नव्हते/ नाही. लहान मुलांकडे त्यांची त्यांची एक ऊर्जा असते आणि ते केवळ त्या ईश्वरीय ऊर्जेने प्रेरित होऊन वागत / खेळत असतात.

ती उर्जाच त्यांना खेळवत असते आणि ते त्यातच रममाण असतात. अनोळखीचे ही आपले वाटतात आणि क्षण साजरे करतात. लहान मुलांच्या सहवासाचा उत्सव होतो आणि आपण त्या उत्सवात पुन्हा लहान होतो. या 2 दिवसात शक्यतो कुणाशीही बोललो नव्हतो याच्याशी मात्र न बोलताही खूप संवाद झाला. माझा हा 2 दिवसांचा उत्सव संपला मात्र पुन्हा वारंवार हा उत्सव स्वतःतच शोधला पाहिजे याची जाणीव झाली. मात्र या साठी इतकं लहान तरी होता यायला पाहिजे किंवा इतक्या लहांनाच्या जवळ जाता आलं पाहिजे; अर्थात त्यांनी येऊ दिलं तर.
श्री स्वामी समर्थ!!!

ता. क. त्याच्या आईच्या परवानगीने हे चित्रण केलं आणि त्यांच्याच परवानगीने इथे पोस्ट करतो आहे. ईश्वर विराज आणि त्याच्या मातापित्यांना निरोगी दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना.

Share this article