Close

‘काहे दिया परदेस’ मालिकेतील सायली संजीव, ऋषी सक्सेना ही जोडी ‘या’ चित्रपटात पुन्हा एकत्र(Kahe Diya Pardes Fem Sayali Sanjeev And Rishi Saxena’s New Marathi Movie)

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांमध्ये 'काहे दिया परदेस' (Kahe Diya Pardes) या मालिकेचा समावेश होतो. ही मालिका चांगलीच गाजली होती. कथानकासह या मालिकेतील पात्रांनाही प्रेक्षकांनी आपली पसंती दर्शवली. मालिकेतील गौरी आणि शिवची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेनंतर त्यांना एकत्र पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. चाहत्यांची ही इच्छा आता पूर्ण होणार आहे. 'समसारा' या सिनेमात सायली संजीव (Sayali Sanjeev) आणि ऋषी सक्सेना (Rishi Saxena) एकत्र दिसणार आहेत.

'काहे दिया परदेस' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलेली सायली संजीव, ऋषी सक्सेना ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. 'समसारा' (द वॉम्ब) या सिनेमात ही जोडी एकत्र आली असून, नुकताच या सिनेमाचा मुहूर्त संपन्न झाला. 'काहे दिया परदेस' या मालिकेत सायली आणि ऋषी यांच्यासह मोहन जोशी, शुभांगी गोखले हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत होते. या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

'समसारा' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सागर लढे यांनी सांभाळली आहे. सागर लढे, विश्वेश वैद्य, समीर मानेकर यांच्या कथेवर समीर मानेकर, सागर लढे यांनी पटकथा रचली आहे. तर समीर मानेकर, निहार भावे यांनी संवादलेखन केलं आहे. नुकताच या सिनेमाचा मुहूर्त संपन्न झाला आहे. 

'समसारा' या सिनेमाची कथा अतिशय अनोखी आहे. गर्भवती भानवीच्या दैवी जुळ्या मुलांना नष्ट करण्याची इच्छा असलेला एक असुर तिच्यासमोर येतो आणि देव, असूर यांच्यात युद्ध सुरू होते. अशाप्रकारे मृत्यूचा देव यम आणि जीवनाची देवी यमी यांची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अत्यंत वेगळी गोष्ट आणि उत्तम स्टारकास्ट यांचा मिलाफ 'समसारा' या सिनेमात झाला आहे. त्याशिवाय प्रेक्षकांची आवडती सायली संजीव आणि ऋषी सक्सेना ही जोडी पुन्हा एकत्र येणं हे महत्त्वाचं आकर्षण ठरणार आहे.

Share this article