Close

वयाच्या ४९ वर्षी टाइट ड्रेस परिधान केल्यामुळे अभिनेत्री काजोल झाली वाईटरित्या ट्रोल, कमेंट सेक्शनमध्ये ट्रोलिंगचा पाऊस(Kajol Gets Body-Shamed For Her Black Bodycon Dress, gets brutally trolled)

अभिनेत्री काजोल तिच्या चाहत्यांना खूप आवडते. तिचा कोणताही व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो. काजोलच्या चाहत्यांनाही तिच्या सुंदर आणि साध्या लूकचे वेड लागले आहे. पण काल, काजोल एका कार्यक्रमात विचित्र कपडे परिधान करून पोहोचली. ज्यामुळे ती बॉडी शेमिंगची शिकार झाली आणि तिला प्रचंड ट्रोल केले गेले.

काजोल काल रात्री एका ओटीटी अवॉर्ड नाईटमध्ये काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून पोहोचली होती, जो अतिशय टाइट आणि फिट ड्रेस होता. या ड्रेसमध्ये काजोल स्वत: कॅमेऱ्यासमोर खूपच अस्वस्थ दिसत होती. या ड्रेसमध्ये काजोलच्या पोटाचे फॅट्स स्पष्ट दिसत होते. शिवाय तिला चालणे कठीण होत होते. काजोल स्वत: पापाराझींसाठी पोज देण्यापासून दूर जाताना दिसली.

जेव्हा काजोलचा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा लोकांनी तिला तिच्या लठ्ठपणाबद्दल ट्रोल करण्यास सुरुवात केली. यावेळी लोकांना ना काजोलचा ड्रेसिंग आवडला, ना तिची देहबोली. आता लोक या व्हिडिओवर विविध कमेंट करून अभिनेत्रीला ट्रोल करत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणी तिला फॅट आंटी म्हणत आहे तर कोणी तिच्या ड्रेसवर कमेंट करत आहे. एका युजरने तर अभिनेत्री प्रेग्नंट आहे का असा सवालही केला.

एकाने लिहिले, 'बाळ जन्माला येणार आहे, अभिनंदन अजय भैया', तर दुसऱ्या युजरने लिहिले की, 'वय वाढल्याने पोटही बाहेर आले आहे'. मात्र, काजोलचे काही चाहते तिच्या समर्थनात आले आणि त्यांनी काजोल प्रत्येक ड्रेसमध्ये सुंदर दिसते असे लिहिले आहे. एकाने लिहिले, 'तू खूप टाइट ड्रेस का घातला आहेस?' तर दुसर्‍याने लिहिले, 'तू इतका टाइट ड्रेस घातला आहेस की तुझे पोट दिसते.'

काजोल शेवटची वेब सीरिज 'द ट्रायल' मध्ये दिसली होती. हा एक कोर्टरूम ड्रामा होता जो प्रेक्षकांना खूप आवडला होता. त्यात काजोलच्या कामाची खूप प्रशंसा झाली होती. या वेबसीरिजसाठी काजोलला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे. यापूर्वी ही अभिनेत्री ‘सलाम वेंकी’ या चित्रपटात दिसली होती.

Share this article