बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही नेहमीच चर्चेत असते. अलिकडेच काजोलने ओटीटीमध्ये पर्दापण केले आहे. सोशल मीडियावर काजोलची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंगही बघायला मिळते. काजोल आणि करण जोहर हे खूप जुने मित्र आहेत. नुकताच काजोलबाबत मोठा खुलासा करण्यात आलाय. काजोलने बॉलिवूडमध्ये एक मोठा काळ गाजवला आहे. आतापर्यंतच्या करिअरमध्ये तिने अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
अजय देवगण आणि काजोल यांचा प्रेमविवाह असला तरी तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की, अजय देवगण नाही तर बॉलिवूडच्या एका दुसऱ्याच अभिनेत्यावर काजोल जीवापाड प्रेम करायची. त्या अभिनेत्याची एक झलक बघण्यासाठी ती कायमच आतुर असायची.
एक बॉलिवूड अभिनेता काजोलचे क्रश होता. मात्र, त्यांची लव्ह स्टोरी सुरुच होऊ शकली नाही. कारण काजोल कधीच आपल्या मनातील फिलिंग त्या अभिनेत्याला बोलू शकली नाही.
विशेष म्हणजे काजोल ज्या बॉलिवूड अभिनेत्यावर स्वत:पेक्षाही अधिक प्रेम करायची तो अभिनेता दुसरा तिसरा कोणीही नसून अक्षय कुमार होता. काजोल अक्षय कुमारला कधीच आपल्या प्रेमाबद्दल बोलू शकली नाही. काजोल ही अक्षय कुमार याच्यावर किती जास्त प्रेम करायची हे फक्त करण जोहर यालाच माहिती होते. याबद्दल करणनेच खुलासा केला.
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)