बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असते. गेल्या अनेक वर्षांपासून कंगना आपल्या दमदार अभिनयाने मोठा पडदा गाजवत आहे. ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे मत मांडते. सध्या सोशल मीडियावर कंगनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती चक्क लग्नपत्रिका वाटताना दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये कंगनाच्या घराला लायटिंग केलेले दिसत आहे. अशातच कंगना गाडीतून नटूनथटून येते. तिला बघताच रिपोर्टर्स तिच्याकडे जातात आणि तिला विचारतात की, “तुम्ही खरोखर लग्नबंधनात अडकणार आहात का?” त्यावर कंगना त्यांना म्हणते की, “बातम्या तर तुम्ही देता. मी फक्त खुशखबर देते.” यानंतर ती तिच्या लग्नाची पत्रिका मीडिया रिपोर्टर्सना देते आणि म्हणते, “तुम्ही सगळे नक्की या.”
तिच्या व्हायरल होत असणाऱ्या या व्हिडीओनंतर नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देत कंगना लवकरच विवाहबद्ध होणार असल्याची चर्चा करायला सुरुवात केली. परंतु ही लग्नपत्रिका तिच्या खऱ्या लग्नाची नसून आगामी चित्रपटातील तिच्या लग्नाची आहे. लग्नपत्रिकेवर ‘टीकू वेड्स शिरू’ असे लिहिले असून तिच्या आगामी ‘टीकू वेड्स शिरू’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे.
https://www.instagram.com/reel/Ctd5hdxgzoK/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
‘टीकू वेड्स शिरू’ या चित्रपटात कंगनासोबत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २३ जून रोजी ‘अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ’या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे.