Close

कपिल शर्माने इंडिगो विमानावर व्यक्त केला राग, १८० प्रवाशांच्या त्रासाचे केले वर्णन ( Kapil Sharma Angry On Indigo Airlines For Delay Flight)

 विमानाने प्रवास करताना अनेक प्रवाशांना वेगवेगळा त्रास सहन करावा लागतो. पण ते सर्व मुकाट्याने सहन करतात. मात्र जेव्हा हा त्रास सेलिब्रेटी मंडळींना होतो तेव्हा मात्र ते यावर त्वरीत आवाज उठवतात. नुकताच असा प्रकार कपिल शर्मासोबत घडला आहे.

कपिल शर्माने X वर एका पोस्टमध्ये इंडिगो फ्लाइटवर आपला संताप व्यक्त केला. तसेच त्याने काही व्हिडिओ शेअर करुन प्रवाशांची अवस्था देखील दाखवली.

X वर व्हिडिओ शेअर करताना कपिल शर्माने लिहिले की, 'प्रिय इंडिगो, आधी तुम्ही आम्हाला बसमध्ये ५० मिनिटे थांबायला लावले आणि आता तुमची टीम म्हणतेय की पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला आहे. नक्की काय खरयं... आम्ही ८ वाजता टेक ऑफ करणार होतो, पण आता ९.२० झाले आहेत. कॉकपिटमध्ये एकही पायलट नाही, तुम्हाला असे वाटते का की हे १८० प्रवासी इंडिगोमध्ये पुन्हा कधी प्रवास करतील? शेमलेस लिहित त्याने आणि इंडिगो फ्लाइटला(#indigo 6E 5149 #shameless टॅग केले.

https://twitter.com/KapilSharmaK9/status/1729891235538821496?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1729891235538821496%7Ctwgr%5Eadc7bb55fc4a8a32aedb652f9adfb7260185a725%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Ftv%2Fnews%2Fkapil-sharma-slams-indigo-over-delayed-flight-netizens-reacted-you-are-behaving-like-the-new-rich%2Farticleshow%2F105607068.cms

पुढील ट्विटमध्ये त्याने फ्लाइटमधून उतरताना प्रवाशांचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांना दुसऱ्या फ्लाइटमध्ये हलवले जात होते. हा व्हिडीओ शेअर करत कपिल शर्माने लिहिले की, 'आता ते सर्व प्रवाशांना उतरवत आहेत आणि सांगत आहेत की आम्ही तुम्हाला दुसऱ्या फ्लाइटने पाठवू, पण सुरक्षा तपासणीसाठी आम्हाला पुन्हा टर्मिनलवर जावे लागणार.

https://twitter.com/KapilSharmaK9/status/1729898518758977948?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1729898518758977948%7Ctwgr%5Eadc7bb55fc4a8a32aedb652f9adfb7260185a725%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Ftv%2Fnews%2Fkapil-sharma-slams-indigo-over-delayed-flight-netizens-reacted-you-are-behaving-like-the-new-rich%2Farticleshow%2F105607068.cms

एका व्हिडिओमध्ये सर्व त्रासलेले प्रवासी विमानतळ प्राधिकरणाला प्रश्न विचारताना दिसत आहेत. कपिलने लिहिले आहे की, लोक तुमच्यामुळे त्रासले आहेत इंडिगो. व्हील चेअरवर काही वृद्ध लोक आहेत, ज्यांची प्रकृती फारशी ठिक नाही. तुम्हाला लाज वाटली पाहिजे.'

https://twitter.com/KapilSharmaK9/status/1729910884749713876?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1729910884749713876%7Ctwgr%5Eadc7bb55fc4a8a32aedb652f9adfb7260185a725%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fnavbharattimes.indiatimes.com%2Ftv%2Fnews%2Fkapil-sharma-slams-indigo-over-delayed-flight-netizens-reacted-you-are-behaving-like-the-new-rich%2Farticleshow%2F105607068.cms

कपिलच्या या सर्व ट्विटवर युजर्यनी उलटी टिका केली आहे. एकजण म्हणाला- कपिल, तुझ्या शोच्या शूटिंगदरम्यान लोकांना जास्त वेळ वॉशरूम वापरण्याचीही परवानगी नसते. कृपया शांत बस आणि परिस्थिती आणखी भडकवू नको. श्रींमतांचे चोचले, कधीतरी भारताचा एक सामान्य नागरिक म्हणून रोजच्यारोज त्यांच्यासारख्या अडचणींचा सामना कर. शांत राहा.'

Share this article