चित्रपट निर्माता करण जोहर त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेकदा ट्रोलच्या निशाण्यावर असतो. करण जोहरला सोशल मीडियावर विशेषतः त्याच्या लैंगिकता आणि नातेसंबंधांच्या स्थितीबद्दल खूप ट्रोल केले जाते. करण 51 वर्षांचा आहे, दोन मुलांचा बाप आहे, पण त्याने अजून लग्न केलेले नाही. तो अजूनही अविवाहित आहे. त्याच्या दोन्ही मुलांचे पालन पोशन तो त्याच्या आईसह करत आहे. याबाबत अलीकडेच एका ट्रोलरने करणला सल्ला दिला की, त्याने आईसाठी सून आणावी. यावर राग अनावर होऊन त्याने सोशल मीडियावरच ट्रोल करणार्याला चोख प्रत्युत्तर दिले
एका ट्रोलरने करण जोहरला कमेंट केली होती की, लग्न कर, सून आली तर तुझ्या आईला टाईमपास मिळेल. आता ट्रोलरवर प्रत्युत्तर देताना करणने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक लांबलचक पोस्ट लिहून आपल्या पद्धतीने फटकारले. करणने लिहिले की, मी ही पोस्ट त्या सर्व वेड्या ट्रोल्ससाठी लिहित आहे जे माझ्या आयुष्यातील निवडींचा न्याय करतात आणि मला शिवीगाळ करतात. मला अशा कमेंट्स खूप आक्षेपार्ह वाटतात. पहिली गोष्ट म्हणजे कोणतीही सून ही कोणत्याही सासूची टाईमपास नसते. सून हे एक लेबल आहे, ज्याला लोक फक्त सामान म्हणून पाहतात. ती एक माणुस आहे, तिला तिच्या आवडीनुसार वेळ घालवण्याचा अधिकार आहे, मग तो वैयक्तिक असो वा व्यावसायिक."
करणने पुढे लिहिले की, "मी सर्वांना सांगू इच्छितो की, माझ्या आईला तिचे आयुष्य पूर्ण करण्यासाठी सुनेची गरज नाही. आई आणि मी मिळून माझ्या मुलांचे संगोपन करतो. तिचे आयुष्य आम्हाला प्रेम देण्यात पूर्ण होते आणि आम्हीही तिला प्रेम देतो. आणि 'सून' आणणे हा पर्याय नाही, ज्यांना माझ्या वैयक्तिक आयुष्याची आणि नातेसंबंधांची काळजी आहे त्यांना मी हे सांगत आहे. माझी मुले भाग्यवान आहेत की त्यांना मार्गदर्शन करणारी आई मिळाली आहे. "
आपल्या लग्नाच्या निवडीचा संदर्भ देत करणने लिहिले, "आणि जर मला आयुष्यात कधी जोडीदाराची गरज भासली, तर मी माझ्यासाठी लग्न करेन, माझी पोकळी भरून काढण्यासाठी, इतर कोणासाठी नाही. माझे ऐकल्याबद्दल धन्यवाद."
करण सध्या कॉफी विथ करणचा ८वा सीझन होस्ट करत आहे. प्रत्येक सीझनप्रमाणेच त्याच्या शोचा हा सीझनही लोकांना खूप आवडला आहे.
फोटो सौजन्य- सोशल मीडिया