Close

करण कुद्राने केला नव्या घरात गृहप्रवेश, तत्पूर्वी घातली विधीवत पूजा  (Karan Kundrra performs Grih Pravesh puja at his new home, Shares glympe of rituals )

लोकप्रिय टीव्ही अभिनेता करण कुंद्रा तेजस्वी प्रकाशसोबतच्या नात्यामुळे चर्चेत असतो. याशिवाय तो प्रोफेशनल लाइफमध्येही खूप व्यस्त आहे आणि सध्या अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे.

एकामागून एक प्रोजेक्टमध्ये व्यस्त असलेल्या करणने मुंबईत त्याचे नवीन घर विकत घेतले आहे  ज्यामध्ये तो आता शिफ्ट झाला आहे

नुकताच करण कुंद्रा त्याच्या नवीन घरात शिफ्ट झाला आहे. स्थलांतरित होण्यापूर्वी, त्याने गृहप्रवेश पूजा केला.  ज्याची एक झलक त्याने सोशल मीडियावर शेअर केली.

नवीन घराच्या गृहप्रवेशाच्या पूजेमध्ये करण पारंपरिक लूकमध्ये दिसला. प्रिंटेड सिल्क कुर्त्यामध्ये करण नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत आहे. करणने गृहप्रवेश पूजा पूर्ण विधी आणि रितीरिवाजांसह केल्याचे फोटोत पाहिल्यावर स्पष्ट होते.

फोटोमध्ये करण संपूर्ण कुटुंबासह होम करताना दिसत आहे. पूजा करताना त्याच्या आजुबाजूला पंडीतही आहेत.

एका फोटोत करण हातात कलश धरून आणि हात जोडून पूर्ण भक्तिभावाने पूजेत तल्लीन झालेला दिसत आहे. या फोटोंमध्ये करण घराच्या लिव्हिंग एरियामध्ये पूजा आणि विधी करताना दिसत आहे.

करणने गेल्या वर्षी हा फ्लॅट विकत घेतला होता आणि आता गणेश चतुर्थीच्या दिवशी गृहप्रवेश पूजेनंतर तो येथे शिफ्ट झाला आहे. मुंबईतील वांद्रे येथील एका आलिशान इमारतीत त्यांचे घर आहे. करणचा हा अपार्टमेंट समुद्रानजीक असून त्याच्या अपार्टमेंटमधून समुद्राचे अप्रतिम दृश्य दिसते. समुद्राभिमुख असण्याव्यतिरिक्त, घरामध्ये खाजगी लिफ्ट आणि स्विमिंग पूल आहे. करणच्या या फ्लॅटची किंमत करोडोंमध्ये आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याने हा फ्लॅट 20 कोटींहून अधिक रुपयांना विकत घेतला आहे.

करण कुंद्राच्या नव्या घराचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्याच्या नवीन भव्य घराची प्रशंसा आणि कमेंट करून चाहते त्याचे सतत अभिनंदन करत आहेत. पण तेजरनचे चाहते तेजस्वी प्रकाशला पूजामध्ये मिस करत आहेत. तेजस्वी पूजेला का आली नाही, असा प्रश्न ते करणला कमेंट सेक्शनमध्ये विचारत आहेत.

Share this article