सणासुदीच्या दिवशी संपूर्ण कुटुंब एकत्र असते त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. करीना कपूरने देखील सोशल मीडियावर अशी एक मजेदार पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ती आपली मुले आणि पती सैफसोबत दिवाळीच्या तयारीत व्यस्त दिसत आहे.
करिनाने दोन फोटो शेअर केले आहेत - पहिल्यामध्ये, करीना, जेह आणि तैमूर जमिनीवर बसले आहेत आणि त्यांच्याभोवती रांगोळीचे रंग विखुरलेले आहेत, तर सैफ उभा आहे आणि तो इथे काय चालू आहे अशाप्रकारे एक्सप्रेशन देत आहे.
हे सर्व लोक एकत्र रांगोळी काढण्याचा प्रयत्न करत आहेत, तर पुढच्या फोटोत जेह बाबा रांगोळीच्या रंगांमध्ये मजा करत आहेत. अशा स्थितीत रांगोळी बनवण्यापेक्षा खराब झालेली दिसते.
या सगळ्यामध्ये पतौडी कुटुंब मजा करत आहे आणि म्हणूनच करीनाने लिहिले आहे - जेव्हा कुटुंब एकत्र रांगोळी काढायचे ठरवतात… की होळी… काही कल्पना नाही… पण महत्त्वाचं म्हणजे आम्ही मजा केली…
या पोस्टवर चाहते कमेंट करत आहेत की मुले अशी वेडी आहेत… याशिवाय करिनाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक फोटो देखील शेअर केला आहे ज्यामध्ये नाश्ता आणि चहा आहे. अभिनेत्रीने लिहिले आहे- ही दिवाळीची वेळ आहे...