कसौटी जिंदगीच्या पहिल्या सीझनपासून बहुतेक लोक अनुराग म्हणून अभिनेता सीजेन खान यांना ओळखतात. सध्या तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. पूर्वी तो त्याच्या लव्ह लाईफ आणि लग्नामुळे चर्चेत होता, आथा अलीकडे तो खूप गंभीर आरोपांमुळे चर्चेत आहे.
अमेरिकेतील रहिवासी आयशा पिरानी यांनी अभिनेत्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आयशा ती सेझनची पत्नी असल्याचा दावा करत आहे. दोघांनी 2015 मध्ये लग्न केले होते. मात्र अभिनेत्याच्या सांगण्यावरून त्याने हे लग्न लपवून ठेवले.
आयशाने ई टाइम्सला सांगितले की सीजेनने फक्त ग्रीन कार्डसाठी तिच्याशी लग्न केले. लग्नानंतरच तो फक्त मजा करायचा. ती काम करून पैसे कमवायची आणि तो आराम करायचा. आयशा म्हणाली की, अभिनेता आपल्याला खूप छळायचा. खोलीत कोंडून ठेवायचा. पैसे हिसकावायचा आणि भांडणही करायचा.
आयशाने आरोप केला आहे की, अभिनेता लग्नानंतर इतर मुलींसोबत फ्लर्ट करत असे. तो त्याच्या मैत्रिणींना घाणेरडे मेसेज आणि व्हॉईस कॉल रेकॉर्ड पाठवत असे.
तिच्याकडे सर्व पुरावे आहेत. ती मुस्लिम आहे, त्यामुळे मुस्लिम कायद्यानुसार ती अजूनही सीजेनची पत्नी आहे, त्यामुळे तिला नुकसानभरपाई मिळण्याचा अधिकार आहे, असेही आयशा म्हणाली. आयशाने 8 लाख भरपाई मागितली आहे. सध्या, एक एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मात्र या प्रकरणात, अभिनेत्याने आरोप नाकारले आहेत आणि आयेशाचे वर्णन एक वेड लागलेली महिला म्हणून केली आहे.
अभिनेता काही दिवसांपूर्वी 'अपने आप' या शोमध्ये दिसला होता. यापूर्वी तो शक्ती-अस्तित्व आणि सीता और गीता या चित्रपटातही दिसला आहे.