Close

कतरिना कैफच्या गरोदरपणाच्या अटकळांना लागला पूर्ण विराम, जवळच्या सूत्रानेच सांगितले सत्य(Katrina Kaif Not Pregnant: Source)

अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफने २०२१ मध्ये लग्न केले. दोघांच्या लग्नाला जवळपास दोन वर्षे झाली आहेत. कतरिना कैफ बर्‍याच काळापासून मीडियापासून दूर आहे, त्यामुळे अभिनेत्रीचे चाहते कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावत आहेत.अभिनेत्री कतरिना कैफ बऱ्याच दिवसांपासून तिच्या चाहत्यांच्या आणि मीडियाच्या नजरेपासून दूर आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी आयोजित केलेल्या गणपती उत्सवातही कतरिना कैफ दिसली नाही. खूप दिवसांपासून आपल्या आवडत्या अभिनेत्रीला न पाहिल्यामुळे तिच्या चाहत्यांची नजर तिला शोधत आहे.कतरिना कैफ तिच्या प्रेग्नेंसीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आल्याने मीडिया आणि तिच्या चाहत्यांपासून दूर आहे, असा अंदाज या अभिनेत्रीच्या चाहत्यांनी लावला.

गेल्या आठवड्यातही, जेव्हा विकी कौशल आणि त्याची पत्नी कतरिना कैफ अंबानी कुटुंबातील गणपती उत्सवात दिसले नाहीत, तेव्हा अभिनेत्रीच्या गर्भधारणेच्या अफवा आणखी जोरात उफळल्या होत्या. इतकेच नाही तर विकी कौशल त्याच्या आईसोबत मुंबईत गणपतीचे दर्शन घेताना दिसला. कतरिनाच्या चाहत्यांना तिला तिच्या पतीसोबत पाहायला न मिळाल्यामुळे खूप आश्चर्य वाटले.

गरोदरपणाच्या अफवांबाबत एका जवळच्या सूत्राने सांगितले - कतरिनाच्या गरोदरपणाच्या अफवांमध्ये अजिबात तथ्य नाही. अभिनेत्री गरोदर नाही. आणि ती लोकांचे लक्ष टाळण्यासाठी अजिबात प्रयत्न करत नाही.खरं, कारण म्हणजे तिच्या कामाच्या कमिटमेंटमुळे कतरिना कैफ तिच्या कामात खूप व्यस्त आहे आणि कामामुळे तिला सतत एका शहरातून दुसऱ्या शहरात जावं लागतं. सध्या कतरिना पती विकी कौशलसोबत आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यास तयार नाही.

Share this article