चाहत्यांना सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ही जोडी नेहमीच आवडते. काही काळ डेट केल्यानंतर दोघांनी यावर्षी ७ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली. सिड आणि कियारा एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अर्थात, सिद्धार्थ स्वत:ला भाग्यवान समजतो की कियाराला त्याने आपली बायको बनवले, तर अभिनेत्रीनेसुद्धा सिद्धार्थशी लग्न करून ती स्वत: ला खूप भाग्यवान समजत असल्याचे म्हटले आहे. यासोबतच अभिनेत्रीने तिच्या पतीबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.
कियारा अडवाणी सध्या तिच्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले की तिचा खऱ्या प्रेमावर विश्वास आहे आणि सिद्धार्थ केवळ तिच्यासाठी घरच नाही तर तो तिचा चांगला मित्र देखील आहे., जेव्हा कियाराला खऱ्या प्रेमाविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने सांगितले की, तिचे काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले आहे. सिद्धार्थसोबत तिचे लव्ह मॅरेज आहे, त्यामुळे साहजिकच तिचा खऱ्या प्रेमावर विश्वास असल्याचे ती म्हणाली.
लग्नाबद्दल बोलताना कियारा म्हणाली की, दोन लोकांचे घर बनते आणि मी खूप भाग्यवान आहे की सिद्धार्थ माझा जोडीदार आहे. तो माझा चांगला मित्र आहे, तो माझ्यासाठी सर्वस्व आहे. आपल्या पतीचे कौतुक करताना तिने सांगितले की, सिद्धार्थ हे माझे घर आहे, आपण जगात कुठेही असलो तरी तो माझे घर आहे.
याआधीही एका मुलाखतीत कियाराने सिद्धार्थबद्दल बोलताना सांगितले होते की, तो सर्वांचा खूप आदर करतो आणि लोकांशी प्रेमाने वागतो. ती म्हणाली होती की, सिद्धार्थ हा खूप चांगला लाइफ पार्टनर आहे, जो मला नेहमी प्रत्येक गोष्टीसाठी प्रेरित करतो.
सिद्धार्थ आणि कियाराच्या प्रेमकथेबद्दल बोलायचे झाले तर, दोघेही 'शेरशाह' चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदाच भेटले होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली आणि या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती, आणि लवकरच ही रील लाईफ केमिस्ट्री रियल लाईफ केमिस्ट्री बनली. राजस्थानमधील जैसलमेर येथे झालेल्या भव्य विवाह सोहळ्यात सिद्धार्थ आणि कियाराने सप्तपदी घेतल्या.
तथापि, कियाराच्या कामाबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री लवकरच कार्तिक आर्यनसोबत 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटात दिसणार आहे, हा चित्रपट २९ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. त्याचवेळी सिद्धार्थ मल्होत्रा त्याच्या आगामी 'योद्धा' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. यासोबतच सिद्धार्थ 'पोलीस फोर्स' या वेब सीरिजद्वारे ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.