मुलांना टिफिनमध्ये काहीतरी वेगळे आणि चविष्ट पदार्थ द्यायचे असतील तर चायनीज टोस्ट द्या. हे ५ मिनिटांत बनवता येते अन् खायलाही स्वादिष्ट आहे.
साहित्य : स्टफिंगसाठी :
२ उकडलेले आणि स्मॅश केलेले बटाटे
१/२ गाजर (किसलेले), २-२ चमचे कोबी, कांदा आणि सिमला मिरची (तीनही बारीक चिरून)
१/२ टीस्पून आले-लसूण पेस्ट
१/४-१/४ टीस्पून लाल तिखट आणि गरम मसाला पावडर
चवीनुसार मीठ, २ चमचे ब्रेडचे तुकडे
इतर साहित्य : ब्रेडचे ६ स्लाइसेस
२ चमचे पांढरे तीळ, २ चमचे तेल
थोडी कोथिंबीर (चिरलेली)
कृती :
प्रथम स्टफिंगचे सर्व साहित्य मिक्स करावे.
ब्रेडचे त्रिकोणी तुकडे करा.
एका भागावरती सारण पसरवा.
वरून तीळ भुरभुरा आणि हलके दाबा.
नॉनस्टिक पॅनमध्ये तेल लावा आणि टोस्ट दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बेक करा.
ग्रीन चिली सॉस बरोबर सर्व्ह करा.