आमिर खानची लाडकी लेक आयरा खानने ३ जानेवारी रोजी तिचा प्रियकर नुपूर शिखरेसोबत रजिस्टर पद्धतीने लग्न केले. त्यानंतर तिने राजस्थान मधील उदयपूर येथे ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. यावेळी त्यांचे कुटुंबीय व काही जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते.
आता काल आयरा आणि नुपूरच्या लग्नाचा भव्य रिसेप्शन सोहळा मुंबईतील नीता अंबानी कल्चरल क्लब येथे पार पडला. या सोहळ्याला बहुतांश बॉलिवूड अवतरलेले. पण यात एक महत्वाची व्यक्ती गैरहजर होती. ती म्हणजे आमिर खानची माजी पत्नी किरण राव.
यापूर्वी झालेल्या लग्नाच्या सर्व विधींमध्ये किरण राव उत्सहाने सहभागी झालेली. अगदी पारंपारिक मराठमोळ्या नऊवारी साडीत ती मिरवताना दिसली. पण कालच्या रिसेप्शन पार्टीत का नव्हती असा प्रश्न सर्वांना पडला.
याबाबत काही पापाराझींनी आमिर खानला विचारले असता त्याने किरण रावच्या गैरहजेरीचे कारण सांगितले.
आमिर म्हणाला की, “आज किरणची तब्येत ठिक नाहीये. तर ही तिच्या चित्रपटाची टीम आहे. त्यामुळे मी तुम्हाला यांची ओळख करून देतो. ‘लापता लेडिज’ जो तिचा चित्रपट येतोय, त्यामधील हे कलाकार आहेत.”
आयरा आणि नुपूरच्या लग्नाबद्दल बोलायचं झाल्यास, मुंबईतील वांद्रे येथे रजिस्टर पद्धतीने लग्न केल्यानंतर या जोडप्याने उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलेले.
फोटो सौजन्य- सोशल मीडिया