Close

कशी करावी कृष्ण जन्माष्टमी पूजा? (Krishna Janmashtami 2023)

कृष्ण जन्माष्टमी हा सण भगवान कृष्णाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. श्रीमद्‌ भागवत पुराणानुसार भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म हा भाद्रपद महिन्यातील अष्टमी तिथी, बुधवार, रोहिणी नक्षत्र आणि वृषभ राशीच्या मध्यरात्री झाला होता. जन्माष्टमीचा सण देशातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात उत्साहाने साजरा केला जातो. कुठे कृष्णाष्टमी तर कुठे गोकुळाष्टमी या नावाने ओळखला जाणारा हा उत्सव यंदा नेमका कधी साजरा करायचा आहे, याबद्दल संभ्रम आहे. ज्योतिषींचे मत आहे की, श्रीकृष्णाचा जन्मोत्सव ६ तारखेच्या रात्रीच साजरा करावा. कारण या रात्री तिथी आणि नक्षत्राचा योग जुळून येत आहे, जो द्वापरयुगात तयार झाला होता.

कशी करावी कृष्ण जन्माष्टमी पूजा?

वैष्णव पंथानुसार द्वारका, वृंदावन आणि मथुरा यासह मोठ्या कृष्ण मंदिरांमध्ये हा उत्सव ७ तारखेला साजरा केला जाणार आहे. ७ ते ८ दरम्यान मध्यरात्री १२ वाजता श्री कृष्ण जन्मोत्सव होणार आहे. धर्मग्रंथानुसार हा भगवान श्रीकृष्णाचा ५२५० वा जन्मोत्सव आहे. चला तर मग, जाणून घेऊयात जन्माष्टमी पूजा.

श्रावण कृष्ण अष्टमी म्हणजेच ६ सप्टेंबर २०२३ या दिवशी गोकुळाष्टमी आहे. जन्माष्टमीचा उपवास सहसा श्रीकृष्णाच्या जन्मानंतर सोडला जातो. ६ सप्टेंबर रात्री पूजेचा मुहूर्त १२ वाजून ०२ मिनिटे ते १२.४८ मिनिटांपर्यंत आहे. भक्तांनी रात्री १२.४२ नंतर जन्माष्टमी सोहळ्यानंतर उपवास सोडता येईल. जन्माष्टमीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दहीहंडी साजरी केली जाते. यंदाचा दहीहंडी सोहळा गुरुवार, ७ सप्टेंबर रोजी होणार आहे.

Share this article