क्रिती सेननचा आगामी चित्रपट 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' प्रदर्शनासाठी सज्ज आहे. हा चित्रपट उद्या ९ फेब्रुवारी २०२४ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. रिलीजच्या एक दिवस आधी आज कृती सेननने सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतले. या चित्रपटात क्रिती शाहिद कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
क्रिती सेनन पिवळ्या रंगाचा सूट परिधान करून मंदिरात पोहोचली. यासोबत तिने मॅचिंग फूटवेअर परिधान केले असून कपाळावर टिळा आणि गळ्यात पिवळ्या रंगाचा स्कार्फ घालून क्रिती मंदिराच्या आवारात दिसली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ विरल भयानीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे.
'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' हा एक प्रेमकथा आहे. यामध्ये क्रिती सेनन रोबोटच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची कथा पूर्णपणे अनोखी आहे. यामध्ये एक माणूस आणि रोबोट यांच्यात प्रेमप्रकरण पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे प्रमोशन जोरात सुरू आहे. बुधवारी या चित्रपटाचा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला.
या चित्रपटात शाहिद कपूर आणि क्रिती सेनन पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसत आहेत. नुकत्याच झालेल्या एका मुलाखती दरम्यान, मुख्य जोडीने चित्रपटात काम करण्याचा त्यांचा अनुभव, त्यांची केमिस्ट्री, प्रेम आणि नातेसंबंधांवरील विचार शेअर केले. रोबोच्या भूमिकेसाठी क्रिती ही योग्य निवड असल्याचे शाहिदने सांगितले. दोघांमधील केमिस्ट्री कायम ठेवण्याचे पूर्ण श्रेयही त्याने क्रितीला दिले.
शाहीद म्हणाला, 'रोबोटच्या प्रेमात पडणं हे माणसाच्या प्रेमात पडण्यापेक्षा फारसं वेगळं नाही'. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना साह यांनी केले आहे. व्हॅलेंटाईन वीक दरम्यान हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. याला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.