अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या अफवा सोशल मीडियावर बऱ्याच दिवसांपासून पसरत आहेत. दोघांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या येत आहेत. यासोबतच मलायका अरोराला सोडून अर्जुन कपूर आता सोशल मीडिया इन्फ्ल्एन्सर कुशा कपिलाला डेट करत असल्याचंही ऐकायला मिळत आहे.
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा वेगळे झाल्याच्या बातम्या बॉलिवूडमधून येत आहेत. त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. आणि आता बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सोशल मीडिया इन्फ्ल्एन्सर कुशा कपिलाला डेट करत आहे. बी-टाऊन अभिनेता अर्जुन कपूरने याबाबत मौन पाळले असले तरी अखेर कुशा कपिलाने अभिनेता अर्जुन कपूरसोबतच्या नात्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, अर्जुन कपूरला डेट करण्याच्या अफवांवर कुशाने तिची प्रतिक्रिया दिली आणि म्हणाली - दररोज माझ्याबद्दल इतके बकवास वाचल्यानंतर, मला स्वतःची औपचारिक ओळख करून द्यावी लागेल. प्रत्येक वेळी मी माझ्याबद्दल असे काहीतरी वाचले की, माझ्या आईने हे सर्व वाचू नये अशी मी देवाला प्रार्थना करते. त्याचं सामाजिक जीवनही बिघडतंय.
खरं तर, कुशा कपिला करण जोहरच्या घरी पार्टीला गेल्यापासून अर्जुन आणि कुशाच्या डेटिंगच्या बातम्या समोर आल्या आहेत. या पार्टीत अर्जुन कपूरही होता. पण मलायका अरोरा त्याच्यासोबत नव्हती. दरम्यान, पार्टीचा एक फोटो व्हायरल झाला, ज्यामध्ये प्रत्येकजण कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे, मात्र अर्जुन कुशाकडे पाहत आहे. मग काय नेटकऱ्यांना संधीच मिळाली आणि त्यांनी कुशा व अर्जुनची जोडी केली.