Close

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत आता लावणी सम्राज्ञी माया जाधव यांची एन्ट्री (Lavani Queen Maya Jadhav Makes Entry In Series “Tujhech Mee Geet Gaat Aahe”)

स्टार प्रवाहच्या तुझेच मी गीत गात आहे मालिकेत साहेबराव आणि मंजुळाच्या नात्याचं रहस्य दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होतंय. अश्यातच मालिकेत एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. दाईमा असं नव्या पात्राचं नाव असून सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी माया जाधव दाईमा ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत. या दाईमाचं मंजुळासोबत खास नातं आहे. दाईमाच्या एण्ट्रीने अनेक नात्यांविषयीचा खुलासा होणार आहे. त्यामुळे तुझेच मी गीत गात आहे मालिकेचे पुढील भाग मनोरंजनाने परिपूर्ण असतील यात शंका नाही.

तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या निमित्ताने अनेक दिग्गज कलाकारांना आपण वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमध्ये पाहिलं आहे. लवकरच माया जाधव यांना देखिल एका महत्त्वपूर्ण भूमिकेत पहाण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. माया जाधव यांनी अनेक सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्येही लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.

Share this article