तेलगू सुपरस्टार महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांची मुलगी सितारा घट्टमनेनी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सितारा घट्टमनेनी ज्वेलरी ब्रँडच्या जाहिरातीत दिसली होती. ही जाहिरात करण्यासाठी सिताराला मोबदला म्हणून मोठी रक्कम मिळाली. मात्र सिताराने मानधन म्हणून मिळालेला पहिला पगार दान केला आहे.
सिताराची न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये जाहिरात चालली होती. न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर चाललेली जाहिरात पाहून सिताराचे वडील आणि तेलुगू सुपरस्टार महेश बाबू यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. एवढ्या लहान वयात आपल्या मुलीचे यश पाहून महेश बाबू फार काही बोलला नाही, फक्त त्याने त्याच्या मुलीचा अभिमान आहे, असे सांगितले.
तेलगू सुपरस्टार महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांची मुलगी सितारा केवळ 11 वर्षांची आहे. सुपरस्टारने सोशल मीडियावर आपल्या मुलीचे फोटो शेअर केले आहेत, तसेच कॅप्शन म्हणून एक भावनिक नोटही लिहिली आहे.
महेश बाबूने लिहिले- 'टाइम स्क्वेअरला उजळणे... मला तुझा अभिमान आहे. तू अशीच चमकत राहा आणि आम्हा सर्वांना चकित करत राहा. पण टाइम स्केअरवर झळकल्यावर सिताराबद्ल आणखी काही गोष्टी समोर आल्या आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, ज्वेलरी ब्रँडच्या जाहिरातीसाठी सिताराला एक कोटी रुपये मानधन मिळाले आहे. मात्र सिताराने आपला पहिला पगार दान केला आहे. खुद्द सिताराने ज्वेलरी लाँचच्या निमित्ताने याचा खुलासा केला आहे. ही बातमी व्हायरल होताच लोकांनी सिताराचे कौतुक करायला सुरुवात केली.