मलायका अरोरा जेव्हा कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा ती नेहमीच चर्चेचा विषय ठरते. अभिनेत्रीचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. तो पाहून सर्वांनाच धक्का बसला. व्हिडिओत जिममध्ये जाणाऱ्या मलायकाच्या पायावर एक मोठा काळा डाग पाहायला मिळाला. तो पाहताच तिच्या पायाला काय झाले अशी चिंता तिचे चाहते व्यक्त करत आहेत. आता मलायकाने ते काळे डाग कसले याचा खुलासा केला आहे.
व्हिडिओ व्हायरल होताच मलायकाला ही दुखापत कशी झाली याबद्दल सांगितले. खरेतर व्हिडिओ व्हायरल झाल्यावर तो डाग उघडपणे दाखवण्यावरुन तिला जोरदार ट्रोल केलं गेलं. यावर तिने नुकतंच उत्तर दिलं आहे. बॉम्बे टाइम्स फॅशन वीक दरम्यान एका संवादात मलायका म्हणाली की, मी खरोखरच खूप वाईट पद्धतीने पडले, यात लपवण्यासारखे काय आहे?
मलायका पुढे म्हणाली, 'ही दुखापत आणखी वाढेल असे मी काहीही घालू शकत नव्हते. त्यामुळे मला ते उघडे ठेवावे लागले. काही जखमांचे डाग राहतात तर काहींचे नाही, पण हेच आयुष्य आहे.