Close

घाणेरड्या पाण्यात १२ तास शूटिंग, शरीराला आलेला थकवा, मनिषा कोईरालाने शेअर केल्या हिरामंडीच्या शूटिंग दरम्यानच्या आठवणी ( Manisha Koirala Share Some Memories Of HeeraMandi Shooting)

मुंबई- सध्या सोशल मीडियावर संजय लीला भन्साळी यांच्या 'हिरामंडी' या वेबसिरीजची जोरदार चर्चा होत असल्याचे पाहायला मिळतेय. या सिरीजला लोकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. सध्या हिरामंडीमधील कलाकार शूटिंगदरम्यान घडलेल्या अनेक गोष्टींचा खुलासाही करत आहेत. अशातच आता अभिनेत्री मनिषा कोईरालाने तिच्यासाठी अवघड असलेल्या त्या सीनबद्दल सांगितले.

मनीषा कोईरालाने नुकतीच तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने काही फोटो शेअर केले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले की, आज लोक माझी खूप प्रशंसा करत आहेत... हे सर्व पाहून मला बरे वाटते. त्यावेळी मला ज्या समस्यांना सामोरे जावे लागले ते पाहून मला आता माझ्या मेहनतीला यश आल्यासारखे वाटते. शूटिंगचे व्यस्त वेळापत्रक, जड दागिने, भरजरी जड असे पोशाख, हे सगळं मिळून माझे शरीर सहन करू शकेल, याची शाश्वती मला नव्हती.

या सिरीजमध्ये माझ्यासाठी सर्वात मोठा आव्हानात्मक कारंजाचा सीन होता. या सीनसाठी मला १२ तासांपेक्षा जास्त पाण्यात राहावे लागले. या दृश्याने माझी परीक्षा घेतली असेल, पण मी हार मानली नाही. पाणी गरम आणि स्फटिकासारखे स्वच्छ असावे याबाबत संजयलाही जाणीव होती, पण काही तासांतच पाणी घाण झाले कारण टीम मेंबर्स, सिनेमॅटोग्राफर आणि आर्ट डायरेक्टर यांना पुन्हा पुन्हा पाण्यात काम करावे लागत होते.

मनीषा पुढे म्हणाली की, माझे संपूर्ण शरीर त्या घाण पाण्यात भिजले होते. शूटिंगच्या शेवटी मी खूप थकले होते, पण माझ्या शरीराने इतका ताण आणि वेदना सहन केल्याबद्दल मला आनंद झाला. ही माझ्यासाठी मोठी परीक्षा होती हे मला माहीत होतं. मनीषाने 'हिरामंडी'मध्ये 'मल्लिकाजन'ची भूमिका साकारली आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/