हिमांशू मल्होत्रा, आभास मेहता व समीक्षा भटनागर यांच्या प्रमुख भूमिका असलेली नवी हिंदी सिरीज 'हंगामा'ने प्रदर्शित केली आहे. ही एक मर्डर मिस्त्री असून त्याचा सस्पेन्स आकर्षक आहे.
अमित नावाच्या महत्त्वाकांक्षी तरुणाची ही कथा आहे. त्याला खुनाच्या कटात गोवण्यात येते. या हत्येचा शोध घेण्यासाठी व स्वतःला निर्दोष करण्यासाठी अमित हरतऱ्हेने प्रयत्न करतो. त्यामध्ये त्याला शालिनीची साथ लागते. या सर्व प्रकरणावर सत्यजीत लक्ष ठेवून आहे. लोकांना वाटते की झालेल्या हत्येमागे सत्यजीतचा हात आहे. अमित या कटकारस्थानातून कसा बाहेर पडतो हे या थ्रिलर मध्ये दाखवण्यात आलं आहे.
या संदर्भात हंगामा डिजिटल मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ रॉय म्हणाले की, "ही मालिका रहस्य आणि रोमांचने भरली आहे. तिचा सस्पेन्स अखेरपर्यंत टिकून राहतो."
अमितची प्रमुख भूमिका करणारा हिमांशू मल्होत्राने सांगितले, " नायकावर जे काही प्रसंग गुजरतात ते पाहून प्रेक्षक खिळून राहतील. आपल्यावर आलेले खुनाचे बालंट तो कसे दूर करतो, त्याची थरारक कथा या मालिकेत आहे."