प्रसिद्ध भजन गायक आणि महादेव भक्त हंसराज रघुवंशी यांना 'मेरा भोला है भंडारी आणि 'शिव सम रहे मुझ में' यांसारखी शिवभक्ती गीते गाऊन घराघरात प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्यासंबंधी आता मोठी बातमी समोर येत आहेत. ते म्हणजे गायक लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. त्यांच्या लग्नाची बातमी ऐकून चाहतेही खूश झाले आहेत आणि लग्नाची झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
हंसराज रघुवंशी यांनी कोमल सकलानीसोबत लग्न केले आहे. लग्नाचे फोटो देखील समोर आले आहेत, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या गायकाला लग्नाचे विधी करताना पाहू शकता.
गायकाने कोमल सकलानीसोबत सरकाघाट, मंडी, हिमाचल प्रदेशात लग्न केले. या लग्नात फक्त त्याचे कुटुंब, जवळचे लोक आणि मित्र उपस्थित होते. हंसराजने त्यांच्या लग्नात सोनेरी रंगाची शेरवानी घातली होती, तर त्याची नवरी लाल लेहेंग्यात पारंपारिक वधूसारखी दिसत होती. तिच्या चुनरीवर "सदा सौभाग्यवती भव" असे लिहिले होते. हंसराज-कोमल वधू आणि वर म्हणून खूप सुंदर दिसत होते.
हंसराज रघुवंशी आणि कोमल यांचा प्रेमविवाह आहे. दोघेही 2017 मध्ये भेटले होते. दोघे ६ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांनी याच वर्षी मार्चमध्ये साखरपुडा केला होता. एका मुलाखतीत गायकाने सांगितले होते की कोमल त्याला खूप सपोर्ट करते आणि त्याची प्रेरणा देखील आहे.
हंसराजबद्दल सांगायचे तर, 31 वर्षीय हंसराज त्याच्या 'मेरा भोला है भंडारी' या गाण्याने देशभर लोकप्रिय झाला होता. त्यांचे 'शिव समा रहे मुझे में और मैं शुन्य हो रहा हू' हे गाणेही खूप गाजले. सोशल मीडियावरही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. हंसराजलाही चाहते बाबाजी म्हणून ओळखतात. तर त्यांची पत्नी कोमल सकलानी एक YouTuber आणि कंटेन्ट क्रिएटर आहे.