बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ लवकरच आई होणार आहे. सध्या ही अभिनेत्री परदेशात राहून तिच्या गरोदरपणाचा आनंद घेत आहे. इलियानाने एप्रिलमध्ये ती गरोदर असल्याचं सांगितलं होतं.
जेव्हा पासून इलियानाने तिच्या गरोदरपणाची घोषणा केली तेव्हापासून तिची चर्चा सुरु आहे. ती लग्नाशिवाय आई होणार असल्याने अनेकांनी तिला ट्रोल केले. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेयर केला होता. त्यामुळे तो होणाऱ्या बाळाच्या वडिलांचा फोटो आहे अशी चर्चा सोशल मडियावर सुरु झाली आहे.
अनेक दिवसांनंतर इलियाना हिने तिच्या बॉयफ्रेंडचा फोटो शेअर केला आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर करत अभिनेत्रीने ‘डेट नाईट’ असं लिहिलं आहे. मात्र तिने तिच्या बॉयफ्रेंडचे नाव काय आणि तो कोण आहे हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही.
इलियानानं शेयर केलेल्या फोटोत तिच्या बॉयफ्रेंडसोबत डेट नाईट एन्जॉय करताना दिसत आहे. हा फोटो तिने इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिले, 'डेट नाइट'.
इलियानानं काही काळापूर्वी तिच्या हातातली अंगठी दाखवत एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोनंतर त्यांची एंगेजमेंट झाल्याची अटकळ बांधली जात होती. मात्र, तिने अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
गेल्या अनेक दिवसांपासून ती तिच्या आयुष्यातले काही खास क्षण चाहत्यांसोबत शेयर करत असते. मात्र आजपर्यंत इलियानाने तिचा प्रियकर किंवा जोडीदार कोण आहे याबाबत खुलासा केला नव्हता. या फोटोपूर्वीही इलियानाने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे काही फोटो शेअर केले होते. तेव्हा तिने चेहरा दाखवला नव्हता. तिने तिच्या प्रियकरासोबत फोटो शेयर केला. त्यामुळे आता पुन्हा चर्चांना सुरवात झाली आहे. मात्र अद्याप तो कोण आहे हे इलियानानं सांगितलेलं नाही.
इलियानाने रणबीर कपूरसोबत 'बर्फी' या चित्रपटातुन तिचा बॉलिवूड डेब्यू केला होता. ती शेवटची 'अनफेअर अँड लव्हली' चित्रपटात दिसली होती. आता ती तिच्या गरोदरपणाचा आनंद घेत आहे.