१ मे रोजी नाच गं घुमा हा मराठमोळा सिनेमा रिलीज झाला. त्यात मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव, मायरा वायकुळ आणि अभिनेता सारंग साठ्ये मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमा रिलीज होऊन आठवडा झाला तरी मुक्ता बर्वेने तो पाहिला नाही. याबाबतचं कारण सांगत म्हणाली-
म्हाला माहित आहे मी आत्ता भारतात नाहीये… कदाचित पहिल्यांदाच असं झालं असेल की माझ्या film च्या release ला मी नाही. त्यामुळे ‘नाच गं घुमा’ release झाल्यापासून मला ना एक अस्वस्थ feeling येतंय…
ते म्हणजे १ मे ला film तर release झाली… आणि आम्ही कलाकृती यासाठीच बनवतो की ती प्रेक्षकांनी बघावी… आणि भरभरून प्रेम द्यावं… आणि… प्रेक्षक सिनेमा बघून कौतुकाने आम्हाला डोक्यावर घेत ही आहेत… पण हे सर्व मी film बघण्या आधीच होतंय..!🙈 चित्रपटाचं भरभरून कौतुक होत आहे… प्रेक्षक appreciate करत आहेत, पण मी अजून film पाहिलीच नाहीये… आणि मला त्याची रुख रुख वाटते आहे. पण हरकत नाही… माझ्या नाटकावर माझ प्रेम आहे… तीही माझी commitment आहेत आणि मी इकडे माझ्या @charchaughi नाटकाचे दौरे अगदी उत्साहाने करते आहे… पण मनाने कुठेतरी मी भारतातही आहे माझ्या team सोबत… माझ्या प्रेक्षकांबरोबर… माझ्या मराठी माणसांबरोबर..!
त्यामुळे आता मी खूप आतुर आहे की कधी मला माझीच film (म्हणजे आपली film) theatre मधे जाऊन तुम्हा सर्वांसोबत बघता येईल..!☺️ इथले सर्व प्रयोग यशस्वीरीत्या पार पाडून मी लवकरच भारतात येतेय… जी काही कमी राहिली आहे माझ्या अनुपस्थितीममुळे… ती मी भरून काढणार आहे..! १२ मे पासून आहेच तुमच्याबरोबर… भेटूया आणि मज्जा करूया…
तोपर्यंत थेटरात ‘घुमोत्सव’ असाच उत्साहात साजरा होत राहू दे..!☺️
‘नाच गं घुमा’ तुमच्या भेटीला १ मे पासून आलेला आहे आणि तो तुम्ही पहिला असेल… पण ज्यांनी नाही पाहिला त्यांनी पाहिलं तिकिट काढा आणि तुमच्या प्रतिक्रिया comments, reels, stories द्वारे आमच्यापर्यंत नक्की पोचवा.🤗