भिंतीवर नववर्षाची दिनदर्शिका लावणं असो किंवा एखादी लहानशी फोटो फ्रेम खिळा हा हवाच! तुम्ही कुठेही असाल, आसपास एक नजर फिरवली तर तुम्हाला असंख्य खिळ्यांचं अस्तित्व जाणवेल. यावरून खिळ्यांना असलेली मागणी तुमच्या लक्षात येईल. अर्थात, खिळे तयार करण्याचा लघुउद्योग नक्कीच फायद्याचा ठरू शकतो. लहान स्तरावर खिळे तयार करण्याचा व्यवसाय सुरू करून कालांतराने खिळ्यांना मिळणारी मागणी वाढली की, या व्यवसायाचं स्वरूप विस्तारता येईल. अशा प्रकारे वाढती मागणी लक्षात येऊन व्यवसायाचा विस्तार करून आपण दरमहा 24 लाख खिळे तयार करणार आहोत, असं गृहीत धरून त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील, हे जाणून घेऊया.
साधनं
खिळे तयार करण्याच्या व्यवसायासाठी आवश्यक यंत्रसामग्री पुढीलप्रमाणे- वायर नेल मेकिंग मशीन : मोठ्या प्रमाणात खिळे तयार करण्यासाठी वायर नेल मेकिंग मशीनची आवश्यकता आहे. या मशीनच्या मदतीने एका मिनिटात 200 ते 250 खिळे तयार होतात. ही मशीन ऑटोमॅटिक असल्यामुळे जास्त कर्मचार्यांची आवश्यकता भासत नाही.
वायर नेल पॉलिशिंग मशीन : वायर नेल मशीनच्या मदतीने तयार करण्यात आलेले खिळे पॉलिश करण्याची गरज असते. पॉलिशिंग मशीनच्या मदतीने खिळे नीट पॉलिश केले जातात. पॉलिश केल्यानंतर खिळे बाजारात विक्रीसाठी पाठवता येतात.
खिळे तयार करण्यासाठी लागणार्या यंत्रसामग्रीच्या संपूर्ण सेटची किंमत जवळपास 5 लाख रुपये आहे. या मशीनच्या मदतीने हवे तसे, लहान-मोठ्या आकाराचे खिळे तयार करता येतात. या यंत्रसामग्रीची किंमत अर्थातच ते यंत्र तयार करणारी कंपनी आणि त्याचा दर्जा यानुसार बाजारात किंवा ऑनलाइन साइट्सवर वेगवेगळी असू शकते.
जागेचं भाडं
खिळे तयार करण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान 1000 चौरस फूट जागेची आवश्यकता आहे. भाडेतत्त्वावर ही जागा घ्यायची झाल्यास, जागेचं भाडं मुंबई, पुणे, दिल्ली यासारख्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं आहे. त्यामुळे तुम्ही कोणत्या शहरात आणि किती मोठ्या जागेत हा व्यवसाय सुरू करणार आहात, यावर प्रामुख्याने जागेच्या भाड्याची रक्कम अवलंबून असेल.
विजेचं बिल आणि अन्य खर्च
हा खर्चही शहरानुसार वेगवेगळा असू शकेल. तरी आपण विजेचं बिल अंदाजे 4000 आणि अन्य खर्च 1000 असेल, असं गृहीत धरू. एकूण प्रशासनिक खर्च (जागेचं भाडे वगळून) 5000 असेल.
कर्मचारी
दरमहा 24 लाख खिळे तयार करायचे आहेत असं गृहीत धरल्यास, आपल्याला किमान 4 कर्मचार्यांची आवश्यकता भासेल. प्रत्येक कर्मचार्याचं प्रतिदिन वेतन सुमारे 300 गृहीत धरलं, तर एकूण 4 कर्मचार्यांचं वेतन दरमहा (1,200 x 25) 30,000 होईल.
कच्चा माल
खिळे तयार करण्यासाठी आपल्याला केवळ तारेची आवश्यकता आहे. अशा तारेच्या बंडलची प्रति टन किंमत सुमारे 45,000 आहे. आपल्याला दररोज सुमारे 960 किलोग्रॅम तारेची आवश्यकता भासेल. त्यानुसार कच्च्या मालाचा प्रतिदिन खर्च होईल, सुमारे 43,200. कच्च्या मालाची ही किंमत, ते तयार करणारी कंपनी आणि मालाचा दर्जा यानुसार बाजारात किंवा ऑनलाइन साइट्सवर वेगवेगळी असू शकते.
प्रक्रिया
खिळे तयार करण्याचा व्यवसाय प्रत्यक्ष सुरू करण्याआधी नेमके कोणत्या प्रकारचे खिळे तयार करायचे आहेत, ते निश्चित करा. त्यानुसार खिळे तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि यंत्रसामग्री ठरवा.
तारेचं बंडल वायर नेल मेकिंग मशीनमध्ये घाला.
मशीन ऑटोमॅटिक असल्याने, तार मशीनमध्ये घातल्यानंतर थेट खिळे तयार होऊन बाहेर येतील.
वायर नेल मेकिंग मशीनच्या मदतीने एका मिनिटात सुमारे 200 ते 250 खिळे तयार होतात.
अशा प्रकारे साधारण अर्धा ते 3 इंच आकाराचे खिळे तयार करता येतील.
वायर नेल मशीनच्या मदतीने तयार केलेले खिळे पॉलिश करायची गरज असते. त्यासाठी वायर नेल पॉलिशिंग मशीन उपयुक्त ठरते.
पॉलिश केल्यानंतर खिळे पॅक करून, बाजारात विक्रीसाठी पाठवता येतील.
लक्षात ठेवा
खिळे तयार करण्याची प्रक्रिया प्रामुख्याने मशीनवर अवलंबून असते, त्यामुळे चांगल्या दर्जाच्या मशीनचा वापर करा.
खिळ्यांचा वापर लक्षात घेता, ते मजबूत असण्याची नितांत गरज असते. त्यामुळे खिळे तयार करण्यासाठी चांगल्या दर्जाच्याच कच्च्या मालाचा वापर करा.
मशीनची योग्य निगा अवश्य राखा.
मशीनची नियमित साफसफाई करा.
पॅकेजिंग
उत्पादन तयार केल्यानंतर त्याचं योग्य प्रकारे पॅकेजिंग करणं गरजेचं आहे. उत्पादनाचं पॅकेजिंग करताना अनेक गोष्टींचं भान ठेवायला हवं. पॅकिंग करताना उत्पादन खराब होणार नाहीत, याची काळजी घ्या.
विक्री
खिळ्यांना सर्वत्रच मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. जिथे कुठे भिंती, फर्निचर इत्यादी असेल, तिथे खिळ्यांचा वापर हमखास केला जातो. म्हणून सर्वच हार्डवेअरच्या दुकानांमध्ये लहान-मोठ्या सर्व प्रकारच्या खिळ्यांची विक्री होते.
अशा विविध हार्डवेअरच्या दुकानांमध्ये तुमच्या खिळे तयार करण्याच्या व्यवसायाची माहिती द्या.
तुमच्या व्यवसायाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी तुमचं नाव आणि संपर्क क्रमांक असलेलं व्हिजिटिंग कार्ड, पॅम्प्लेट, बॅनर छापू शकता.
सध्या सोशल मीडियाचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. तेव्हा तुमच्या व्यवसायाची माहिती फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, यू-ट्यूब यासारख्या संकेत स्थळांवरही देता येईल.
परवाना
एखाद्या लघुउद्योगाचा प्रारंभ केल्यास त्याची नोंदणी (रजिस्ट्रेशन) करणं अत्यंत गरजेचं आहे.
लघुउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध प्रकारच्या योजनांमधून मदत करतं. त्यामुळे व्यवसायाची नोंदणी केल्यास त्या योजनांचा लाभ घेता येईल.
कर्ज सुविधा
लघुउद्योग सुरू करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, ती म्हणजे भांडवल. लघुउद्योग सुरू करण्यासाठी लागणारी पुरेशी रक्कम तुमच्याजवळ उपलब्ध नसल्यास तुम्ही कर्ज घेऊ शकता. घराजवळच्या अथवा तुमचं खातं असलेल्या बँकेत तुम्हाला कर्जासाठी अर्ज करता येईल. प्रत्येक बँकेचा व्याज दर, तसंच कर्ज घेण्याची प्रक्रिया वेगवेगळी असू शकते.
लघुउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारही इच्छुकांना आर्थिक मदत करतं. भारत सरकारतर्फे छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘प्रधानमंत्री मुद्रा योजने’ची सुरुवात करण्यात आली आहे. या मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज आणि इतर काही सुविधा उपलब्ध आहेत. या सोयीसुविधा देशातील अनेक बँकेत उपलब्ध आहे. मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारची माहिती अथवा मदत हवी असल्यास खालील फोन नंबर, वेबसाइट आणि ई-मेलवर संपर्क करता येईल.
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना
वेबसाइट : www.mudra.org.in
ई-मेल : [email protected]
टोल-फ्री क्रमांक ः 18001801111 आणि 1800110001.
- सायली शिर्के
संपर्क
खिळे तयार करण्याचा लघुउद्योग सुरू करायचा असल्यास, या व्यवसायासाठी लागणारी यंत्रसामग्री, तसंच कच्चा माल याविषयीच्या माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
एकता इंडस्ट्रीज (यंत्रसामग्रीसाठी)
80 फिट रोड, अजी वसाहत स्ट्रिट नंबर 6,
अजय वेटब्रीजच्या मागे, राजकोट, गुजरात 360 003.
संपर्क : 9924405739, 9714782110.
ई-मेल : [email protected]
वेबसाइट : www.ektaindustries.co.in
अरिहंत स्टील (कच्च्या मालासाठी)
अग्रवाल इंडस्ट्रियल इस्टेट, युनिट 1, प्लॉट क्र. 3,
सतीवली कमान रोड, वसई पूर्व, ठाणे, महाराष्ट्र 401208.
संपर्क : 9322290173.
ई-मेल : [email protected], [email protected]
वेबसाइट : www.arihantsteel.com
परफेक्ट मशीन टूल्स (यंत्रसामग्रीसाठी)
512, ईस्ट मोहन नगर, इंडस्ट्रियल एरिया,
अमृतसर, पंजाब 143001.
संपर्क : 9815165477.
ई-मेल : [email protected]
वेबसाइट : www.perfectmachinetools.co.in
मानेकलाल अँड सन्स (यंत्रसामग्रीसाठी)
67, बजाज भवन, नरिमन पॉइंट, मुंबई, महाराष्ट्र 400021.
संपर्क : 8879795490, 022 -22041340/41/42.
ई-मेल : [email protected], [email protected]
वेबसाइट : www.maneklalexports.com
गुरुकृपा इंडस्ट्रीज (यंत्रसामग्रीसाठी)
4, न्यू नेहरू नगर, अहिर चौक, अतिका इंडस्ट्रीयल एरिया, राजकोट, गुजरात 360002.
संपर्क : 7990709519, 9601155559.
ई-मेल : [email protected]
वेबसाइट : www.nailmakingmachine.com
पायोनियर स्टील अँड इंजिनियरिंग (कच्च्या मालासाठी)
31, कटारिया मेंशन, एस.व्ही.पी. रोड,
खेतवाडी सातवी गल्ली, गिरगांव, मुंबई, महाराष्ट्र 400004.
संपर्क : 9372019211, 8042966155.
वेबसाइट : www.wirestainless.com
एस. के. इंजिनिअर्स (यंत्रसामग्रीसाठी)
102, गार्डन सिटी कॉलनी, नव्या पासपोर्ट ऑफिसजवळ, बरेली, उत्तर प्रदेश 243005.
संपर्क : 9719930933, 7248448834.
ग्राहक सेवा : 8048551131, 8081308899, 8755011715.
ई-मेल : [email protected]
वेबसाइट : www.skengineer.org
प्रकाश इंडस्ट्रीज लिमिटेड (कच्च्या मालासाठी)
श्रीवन बीजवसन, नवी दिल्ली 110061.
संपर्क : 011 25305800.
ई-मेल : [email protected]
वेबसाइट : www.prakash.com
सुखराज मशिनरी (यंत्रसामग्रीसाठी)
52, इंडस्ट्रियल ओल्ड फोकल पॉइंट, मेहता रोड,
अमृतसर, पंजाब 143001.
संपर्क : 6239268216, 9814312452.
ई-मेल : [email protected]
वेबसाइट : www.sukhrajmachinery.com
सध्याचा जमाना ऑनलाइनचा असल्याने खिळा तयार करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्रीही ऑनलाइन साइट्सवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या साइट्सवर मशीन, किंमत, क्षमता याबाबत योग्य माहितीही मिळेल.
वेबसाइट
www.indiamart.com
www.alibaba.com
www.amazon.in
https://dir.indiamart.com/impact/nails-making-machine.html. (यंत्रसामग्रीसाठी)
https://www.alibaba.com/showroom/raw-material-of-wire-nail.html (कच्च्या मालासाठी)