Close

प्रदूषणात बाहेर पडण्यापूर्वी कोणती खबरदारी घ्यावी? (Necessary Precautions To Be Taken Before Going Out In Pollution)

  • थंडीच्या या दिवसात प्रदूषणाने कहर केला आहे. मुंबई व दिल्ली या महानगरात प्रदूषणाची पातळी मोठी आहे. जी आपल्या आरोग्यास घातक आहे. या संबंधी मुंबई येथील सर एचएन रिलायन्स फांऊडेशन हॉस्पिटलच्या फुप्फुसीय औषध सल्लागार डॉ. रिचा मित्तल यांनी धक्कादायक आकडेवारी सादर केली आहे.

त्या म्हणतात, “जगभरात २०१९ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, ३० पैकी २१ एवढी सर्वाधिक प्रदूषित शहरे भारतातील आहेत. तसेच अलिकडेच म्हणजे नोव्हेंबर २०२२ मध्ये केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, आपला देश सध्याच्या असुरक्षित ऑरेंज झोन मधून २०२३ साली अत्यंत असुरक्षित अशा रेड झोनमध्ये जाण्याची शक्यता आहे. वायु प्रदूषणामुळे आरोग्यावर घातक परिणाम होतात आणि एका आकडेवारीनुसार दरवर्षी २० लाखांहून अधिक भारतीय लोक या वायू प्रदुषणामुळे आपला जीव गमावतात.” अशा स्थितीत आपले व कुटुंबाचे रक्षण कसे करावे, या संबंधी डॉ. रिचा यांनी काही सोप्या टिप्स दिल्या आहेत.

  • ज्या दिवशी प्रदूषणाची पातळी जास्त असते, त्या दिवशी विशेषतः सकाळी किंवा संध्याकाळी उशिरा बाहेर फिरायला जाणे टाळा. ऑरेंज रंगाच्या दिवसातही हृदयाचे, फुप्फुसाचे किंवा इतर आजार असलेल्या अथवा वृद्ध लोकांनी घरात राहणे शहाणपणाचे आहे. धुके असलेल्या दिवसात घराबाहेर कोणत्याही प्रकारचा व्यायाम करू नका. घरात करा.
  • घराबाहेर पडताना मास्क जरूर वापरा. हा मास्क नाक आणि तोंड झाकणारा असावा. सैल मास्क नसावा.
  • प्रदूषणाची पातळी कमी करण्याची आपल्या घरापासून सुरुवात करा. घरात अगरबत्ती, मेणबत्ती आणि तेलाचे दिवे जाळणे टाळा. स्वयंपाकघरात चिमणी किंवा हवा बाहेर फेकणारे एक्झॉस्ट लावा. उर्जेचा वापर कमी करा. वीजनिर्मितीने वायू प्रदूषण होते. एअर फ्रेशनर्स टाळा. ते आरोग्यास चांगले नसतात. त्याऐवजी एअर प्युरिफायर वापरा. ते घरातील हानिकारक कण, धूर आणि मूस काढून टाकण्यास मदत करतात.
  • घराबाहेर पडताना तुमची त्वचा आणि डोळे सुरक्षित ठेवा. त्वचेचे विकार टाळण्यासाठी सनस्क्रीन लावा.
  • ओमेगा -३ फॅटी ॲसिडस्‌ युक्त समृद्ध व संतुलित आहार घ्या.

Share this article