नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात मृणाल ठाकूरने पापाराझींनी बॅक पोज देण्यास सांगितल्यावर त्यांना गप्प केले होते. पलक तिवारीही पापाराझींना ओरडली होती जेव्हा तिने विनंती करूनही त्यांनी तिचे मागून फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न केला.
अभिनत्री नोरा फतेही पापाराझींसोबत अगदी मिळून मिसळून दिसते. अनेकदा कोणतीही चिंता न करता त्यांच्यासाठी पोझ देते, परंतु यावेळी तिने तिची नाराजी व्यक्त केली आहे.
न्यूज18 शोशा सोबत याबद्दल बोलताना नोरा म्हणाली, 'मला वाटते की त्यांनी (पापाराझी) याआधी कधीही अशी बॅक पाहिली नाही. जे आहे ते आहे. ते केवळ माझ्यासोबतच नाही तर इतर महिला कलाकारांसोबतही असे करतात.
कदाचित ते त्यांच्या पाठीवर झूम करत नाहीत कारण ते तेवढं एक्सायटिंग दिसत नसेल, परंतु ते अनावश्यकपणे शरीराच्या इतर भागांवरही झूम करत बसतात. कधी कधी माझ्या मनात येत इथे झूम करण्यासारखं काही नाही मग ते एवढं फोकस कशावर करतात.