Close

अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर ‘न्याय रक्षक’ येतोय! (‘Nyay Rakshak’ is coming on Ultra Zakas Marathi OTT!)

आईकडून मुलांना मिळणारं ज्ञान आणि संस्कार आयुष्याच्या जडणघडणीत पुरून उरत असतात. अशाच आई आणि मुलाची समाजाप्रती एक संघर्षमय कथा ‘न्याय रक्षक’ या कन्नड चित्रपटात दडून आहे. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर चित्रपटाच्या मराठी रूपांतराचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार असून प्रेक्षकांना आई आणि मुलाच्या विलक्षण नात्याची अनुभूती येणार आहे.

सत्यासाठी जीव देणाऱ्या सत्यवादी आईचा सत्यवादी मुलगा समाजाचा प्रतिनिधी होऊन समाजासाठी लढतो आहे. हा लढा समाजाचं शोषण करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांच्या विरोधात आहे. प्रस्थापित राजकीय पुढाऱ्यांच्या होणाऱ्या शोषणापासून अखंड समाजाला वाचवू शकेल का चित्रपटाचा नायक? या प्रश्नाचं उत्तर हे चित्रपटात मिळणार आहे.     

Share this article