Close

omg २ चित्रपटाचे वाद काही संपेना, उज्जैन महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यांनी टाकला चित्रपटावर बहिष्कार (OMG-2 Controversy: Ujjain Mahakaleshwar Temple Priest Demands Deletion Of Scenes Shot At Mahakal Temple)

अक्षय कुमारचा ओह माय गॉड 2 हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. या आधी चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळत नव्हते, मग चित्रपटातून 20 दृश्ये काढून टाकण्यास सांगण्यात आले, त्यानंतर कुठे चित्रपटाला ए प्रमाणपत्र देऊन प्रदर्शित करण्याची परवानगी देण्यात आली.

सर्टिफिकेटचा अर्थ असा आहे की फक्त प्रौढ लोकच चित्रपट पाहू शकतात, हा चित्रपट मुलांसाठी नाही. त्यामुळे पुजाऱ्यांचा रोष वाढत आहे. खरे तर, चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण उज्जैनच्या महाकाल मंदिरात झाले असून मंदिराचे मुख्य पुजारी महेश शर्मा म्हणतात की, चित्रपटाला ए प्रमाणपत्र मिळाले आहे, यावरून त्यात अश्लीलता असल्याचे स्पष्ट होते.

अशा परिस्थितीत महाकाल मंदिरात चित्रीत झालेली सर्व दृश्ये आणि धार्मिक दृश्ये चित्रपटातून काढून टाकण्यात यावीत, असे मुख्य पुजाऱ्यांनी म्हटले आहे. उज्जैन महाकाल हे लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे, अशा परिस्थितीत मंदिर परिसरात चित्रित झालेली ती दृश्ये चित्रपटातून वगळण्यात यावीत.

मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याचे म्हणणे आहे की, असे न केल्यास आम्ही एफआयआर नोंदवू. गरज पडल्यास लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर केवळ मध्य प्रदेशच नाही तर राजस्थान, गुजरात आणि सोशल मीडियावरही याला विरोध होत आहे. हिंदू देवतांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे लोकांचे म्हणणे आहे. हा श्रद्धेचा प्रश्न आहे.

उज्जैन व्यतिरिक्त इतर राज्यांतील धार्मिक स्थळांवर चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले असून चित्रपटाची रिलीज डेट 11 ऑगस्ट आहे.

Share this article