भारतीय सिनेसृष्टीचे महानायक म्हणजे अमिताभ बच्चन येत्या ११ ऑक्टोबरला त्यांचा ८१ वा वाढदिवस साजरा करणार आहेत. हा वाढदिवस मात्र खूपच स्पेशल असणार आहे. कारण अमिताभ बच्चन यांच्या खास वस्तूंचा जाहीर लिलाव होणार आहे. अमिताभ यांच्या आयुष्यातील असंख्य स्पेशल आठवणी यावेळी लिलावासाठी ठेवण्यात येणार आहेत.
११ ऑक्टोबर रोजी हिंदी चित्रपटसृष्टीतील शहेनशाह अर्थात अमिताभ बच्चन वयाची ८१ वर्ष पूर्ण करणार आहेत. अशा परिस्थितीत त्यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा होणार आहे. म्हणजेच ५ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत बिग बींच्या वाढदिवसापूर्वी त्यांच्या सर्व खास गोष्टींचा लिलाव होणार आहे. हा लिलाव Rivas & Ives द्वारे आयोजित केला जात आहे.
अमिताभ बच्चन यांच्या कोणत्या वस्तूंचा लिलाव होणार?
अमिताभ बच्चन यांच्या उज्ज्वल कारकिर्दीला आदरांजली वाहण्यासाठी 'बच्चनेलिया' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात चाहत्यांना बिग बींच्या सिनेमॅटिक करिअरला पुन्हा जिवंत करण्याची संधी मिळणार आहे. यावेळी अमिताभ बच्चन यांच्या काही गोष्टींचा लिलाव होणार असून त्यात त्यांच्या लोकप्रिय चित्रपटांचे पोस्टर्स, फोटो, लॉबी कार्ड, शोकार्ड, चित्रपट मॅगझीन आणि काही सिनेमांच्या ओरीजीनल DVD चा समावेश आहे.
अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसापूर्वी होणार्या लिलावात अनेक आकर्षण असणार आहे. यामध्ये 'जंजीर', 'दीवार', 'फरार'चे शोकार्ड सेट, 'शोले'चे व्हिडीओ शूटींग, 'शोले' रिलीज झाल्यानंतर आयोजित रमेश सिप्पी यांच्या खास पार्टीची चार खास फोटो, 'मजबूर' चित्रपटाचे दुर्मिळ पोस्टर्स यांचा समावेश असेल.
'श्री. नटवरलाल, 'द ग्रेट गॅम्बलर', 'कालिया', 'नसीब', 'सिलसिला' आणि प्रसिद्ध ग्लॅमर फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष यांनी शूट केलेले अमिताभ यांचे दुर्मिळ स्टुडिओ पोर्ट्रेट सुद्धा लिलावात ठेवण्यात येणार आहेत.
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)