बॉलिवूडमधील सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक असलेली राणी मुखर्जी तिच्या आकर्षक अभिनयासोबतच तिच्या आवाजामुळे चाहत्यांना वेड लावते. तिने आदित्य चोप्रासोबत लग्न केल्यावर तिचे चाहते दु:खी झाले होते. मात्र, ज्या पंडितजींनी त्यांचे लग्न लावले त्यांनी त्यांच्या खास दिवशी असे कृत्य केले होते, ज्यामुळे सर्वांनाच हसायला भाग पडले. जाणून घेऊया राणी आणि आदित्यच्या लग्नाशी संबंधित हा मजेदार किस्सा...
काही काळापूर्वी राणी मुखर्जी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध ड्रेस डिझायनर सब्यसाची मुखर्जीसोबत एका शोमध्ये पोहोचली होती. या शोमध्ये राणीने तिच्या आणि आदित्य चोप्राच्या लग्नाशी संबंधित अनेक खुलासे केले. दरम्यान, डिझायनर सब्यसाची मुखर्जीनेही राणीच्या लग्नाशी संबंधित एक मजेदार किस्सा सांगितला.
राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांनी इटलीमध्ये एकमेकांसोबत लग्न केले. राणीने तिच्या लग्नासाठी बंगालमधील एका पंडिताला सोबत आणले होते, याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने केला होता. या लग्नात डिझायनर सब्यसाचीही पोहोचले होते.
राणीच्या लग्नाशी संबंधित एक मजेदार किस्सा सांगताना सब्यसाचीने सांगितले की, अभिनेत्रीच्या लग्नात ते पंडितांचा अनुवादक म्हणूनही काम करत होता. लग्नाच्या वेळी पंडितजी त्यांच्या जवळ आले आणि विचारले की, भात मिळेल का? पंडितजींनी हे सांगितल्यावर सब्यसाचीने त्यांना विचारले होते की तुम्हाला भात का हवा आहे?
सब्यसाचीने पुढे सांगितले की, तेव्हा पंडितजींनी त्यांना सांगितले की, त्यांना येथे रोज मॅगी खायला दिली जाते, त्यामुळे त्यांना गॅसची समस्या झाली आहे. पंडितजींचे बोलणे ऐकून सब्यसाची हसले, कारण पंडितजी स्पॅगेटीला मॅगी मानत होते. पंडितजींचे बोलणे ऐकून लग्नाला उपस्थित असलेले पाहुणे आणि खुद्द राणी मुखर्जीलाही हसायला आलेले.
राणी मुखर्जी ही आदित्य चोप्राची दुसरी पत्नी आहे दोघांनीही लग्नाआधी अनेक वर्षे एकमेकांना डेट केले होते, त्यानंतर 2014 मध्ये लग्न केले. या स्टार जोडप्याला आदिरा नावाची मुलगी आहे.